Home /News /entertainment /

घटस्फोट घेतल्यानंतर समंथाला पहिल्यांदाच झाली नागा चैतन्यची आठवण, निमित्त देखील खास

घटस्फोट घेतल्यानंतर समंथाला पहिल्यांदाच झाली नागा चैतन्यची आठवण, निमित्त देखील खास

दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभूनं (Samantha Ruth Prabhu) नागा चैतन्यपासून (Naga Chaitanya) वेगळं झाल्यानंतर पहिल्यांदाच त्याचा फोटो शेअर केला आहे.

    मुंबई, 6 मार्च- दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभूनं (Samantha Ruth Prabhu) नागा चैतन्यपासून (Naga Chaitanya) वेगळं झाल्यानंतर पहिल्यांदाच त्याचा फोटो शेअर केला आहे. नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतल्यानंतर तिनं पहिल्यांद इन्स्टावर त्याचा फोटो शेअर केला आहे. सिने जगतातील या लोकप्रिय जोडीनं जेव्हा वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा सर्वांनाच धक्क बसला होता. असं जरी असलं तरी वेगळं होण्याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही. तिला ‘मजिलि’ (Majili) या सिनेमाला तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला नागा चैतन्यची आठवण आली आहे. समंथानं मंगळवारी इन्स्टा स्टोरीवर एक पोस्टर शेअर करत मजिलि या सिनेमाला तीन वर्ष पूर्ण झाल्याचं तिनं सांगितलं. या सिनेमात नागा आणि समंथाच्या प्रमुख भूमिका होत्या. हा सिनेमा 5 एप्रिल 2019 मध्ये रिलीज झाला होता. समंथानं शेअर केलेल्या या पोस्टरमध्ये नागाने साकरलेला चंदर राव रागात दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत नागा आणि समंथा रोमॅंटिक पोझमध्ये दिसत आहेत. पोस्टर शेअर करत तिनं म्हटलं आहे की, 3years of majili’. वाचा-Rashmika mandannaने काढली थालापती विजयची दृष्ट, फोटो शेअर करत म्हणाली... समंथाने नागाला इन्स्टावर केलं अनफॉलो समंथाने मागील महिन्यात नागाला इन्स्टावर अनफॉलो केलं आहे. या सगळ्यात नागानं देखील त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सोशल मीडियावर माहिती दिली आहे. नागा चैतन्य फिल्म निर्माता वेंकट प्रभु यांच्यासोबत काम करणार आहे. समंथा-नागाने माच्या वर्षात एकमेकांपासून वेगळं होण्याचा घेतला निर्णय समंथा आणि नागा यांची जानेवारी 2017 मध्ये हैदराबादमध्ये एंगेजमेंट झाली होती. यानंतर 6 ऑक्टोबरला गोव्यात लग्न झाले. सगळं काही चांगलं सुरू असतानं 2021 मध्ये दोघांनी वेगळं होणार असल्याचं सांगितलं. दोघांनी एक निवेदन जारी करत घटस्फोट घेत असल्याचे सांगितलं होतं.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Bollywood News, Entertainment, Tollywood

    पुढील बातम्या