Home /News /entertainment /

Samantha- Naga Chaitanya: लग्नात नागा चैतन्यने दिलेली 'ही' महागडी भेटवस्तू समंथाने केली परत

Samantha- Naga Chaitanya: लग्नात नागा चैतन्यने दिलेली 'ही' महागडी भेटवस्तू समंथाने केली परत

साऊथमधील (South) पॉवर कपल म्हणून समंथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि नागा चैतन्य (Naga Chaitnya) यांच्या जोडीला ओळखलं जात होतं. परंतु अचानक घटस्फोट सारखा टोकाचा निर्णय घेत या दोघांनी सर्वांनाच थक्क केलं होतं.

    मुंबई, 10 मार्च-   साऊथमधील  (South)  पॉवर कपल म्हणून समंथा रूथ प्रभू  (Samantha Ruth Prabhu)  आणि नागा चैतन्य  (Naga Chaitnya)  यांच्या जोडीला ओळखलं जात होतं. परंतु अचानक घटस्फोट सारखा टोकाचा निर्णय घेत या दोघांनी सर्वांनाच थक्क केलं होतं. या दोघांच्या घटस्फोटाला आता जवळजवळ पाच महिने होत आले आहेत. मात्र आजही चाहत्यांना या गोष्टीवर विश्वास ठेवणं कठीण होतंय. दरम्यान अभिनेत्रीने आपल्या जवळ असलेली नागा चैतन्यची एक खास गोष्ट त्याला परत केली आहे. पाहूया ती गोष्ट नेमकी कोणती आहे. मीडिया रिपोर्टनुसार, समंथा प्रभूने नागाच्या कुटुंबाकडून त्यांच्या लग्नात मिळालेली महागडी साडी त्यांना परत केली आहे. खरं तर, नागा चैतन्यच्या आजीने समंथाला लग्नात ही साडी भेट केली होती. ही एक फारच महागडी भेटवस्तू होती. परंतु घटस्फोटाच्या पाच महिन्यानंतर अभिनेत्रीने साडीसुद्धा परत केलेली आहे. तिला नागा चैतन्यच्या कोणत्याही आठवणी आपल्या जवळ ठेवायच्या नसल्याचं म्हटलं जात आहे. लग्नानंतर समंथाने लाल रंगाच्या बनारसी साडीत आपले अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. ही साडी अभिनेत्रीची डिझायनर मैत्रीण क्रेशा बजाजने डिझाईन केली होती. नागा चैतन्य आणि समंथा प्रभू यांची जोडी प्रचंड पसंत केली जात होती. साऊथमधील सर्वात लोकप्रिय जोड्यांपैकी एक त्यांची जोडी होती. त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. या जोडीचे अनेक फोटो सोशल मीडियावर पाहायाला मिळत असत. परंतु त्यांच्या घटस्फोटाने चाहत्यांना धक्का बसला आहे. अनेक चाहते या कलाकरांवर नाराज आहेत. समंथा आणि नागा चैतन्यने 2017 मध्ये लग्न केलं होतं. या दोघांनी गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं. त्यांचे लग्नाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर आजही पाहायला मिळतात. (हे वाचा:जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये समंथा आहे दुसऱ्या स्थानावर, मग पहिली कोण? ) समंथा नुकतंच 'पुष्पा: द राइज' चित्रपटातील 'ओ अंटावा' या गाण्यामध्ये दिसली होती. लवकरच ती 'शाकुंतलम' आणि 'यशोदा'मध्ये दिसणार आहे. ज्यासाठी तिने शूटिंगही पूर्ण केले आहे. याशिवाय ती फिलिप जॉन दिग्दर्शित 'अॅरेंजमेंट ऑफ लव्ह' मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट भारतीय लेखक टिमरी एन मुरारी यांच्या कादंबरीवर आधारित आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, South actress, South indian actor

    पुढील बातम्या