मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'त्या' रिऍक्शनमुळे रश्मिका होतेय ट्रोल; काही वेळेतचं 1.2 मिलियन लोकांनी पाहिला हा VIDEO

'त्या' रिऍक्शनमुळे रश्मिका होतेय ट्रोल; काही वेळेतचं 1.2 मिलियन लोकांनी पाहिला हा VIDEO

रश्मिका लवकरच बॉलिवूडच्या 2 चित्रपटांत दिसून येणार आहे.

रश्मिका लवकरच बॉलिवूडच्या 2 चित्रपटांत दिसून येणार आहे.

रश्मिका लवकरच बॉलिवूडच्या 2 चित्रपटांत दिसून येणार आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 3 जुलै-  दक्षिणात्य अभिनेत्री(South Actress) आणि नॅशनल क्रश (National Crush) अभिनेत्री रश्मिका मंदना(Rashmika Mandanna) नुकताच मुंबईमध्ये एके ठिकाणी दिसून आली. यावेळी ती आपल्या कारमधून बाहेर उतरली. मात्र ती मास्क घालायला विसरली. यावेळी माध्यमे तिला कॅमेरात टिपत होते. मात्र ज्यावेळी तिला लक्षात आलं की आपण मास्क विसरला आहे, त्यावेळी ती थोडं जास्तच ड्रामॅटिक रिएक्शन देऊ लागली. हा व्हिडीओ माध्यमांच्या (Viral Video) कॅमेरात कैद झाला. आणि बघता बघता तो व्हायरल देखील झाला. मात्र व्हायरल होताचं, अभिनेत्री मोठ्या प्रमाणात ट्रोल होऊ लागली आहे.

रश्मिका मंदनाचा हा व्हिडीओ विरल भयानीने आपल्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेयर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसून येत आहे.  रश्मिका कारमधून उतरल्यानंतर आपला मास्क घातलेली नसते. मात्र जेव्हा तिला याची जाणीव होते. ती अचानक शॉक होते. आणि ड्रामॅटिक रिएक्शन देऊ लागते. हाताने आपल्या चेहऱ्याला झाकण्याचा प्रयत्न करते. काही वेळेनंतर एक काळ्या रंगाचा मास्क घालून ती माध्यमांसमोर उभी राहते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताचं, युजर्स तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करत आहे.

एका युजरने कमेंट करत म्हटलं आहे, ओव्हरऍक्टीग 100 रुपये कापा, तर दुसऱ्या एका युजरने म्हटलं आहे, ओव्हरऍक्टीगकी दुकान, तर आणखी एका युजरने म्हटलं आहे, ‘हे थोडं जास्तचं झालं आणि होणारचं कारण बॉलिवूडमध्ये नवीन आहे ना’. अशा पद्धतीच्या 300 पेक्षा जास्त कमेंट्स करून युजर्सने रश्मिकाला ट्रोल केलं आहे. आत्तापर्यंत 1.2 मिलियन लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

(हे वाचा:Darlings: आलिया भट्ट झाली निर्माती; शुटींगच्या पाहिल्याचं दिवशी दिसली नर्व्हस  )

रश्मिकाच्या कामाबद्दल सांगायचं तर ती लवकरच अमिताभ बच्चनसोबत ‘गुड बाय’ या चित्रपटात झळकणार आहे. तसेच सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘मिशन मजनू’ मध्ये सुद्धा दिसून येणार आहे. रश्मिका साउथची खुपचं प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आणि बघता बघता ती नॅशनल क्रश बनली आहे.

First published:

Tags: Rashmika mandanna