Home /News /entertainment /

'तासंतास सराव केला...' सोशल मीडियावर 'सामी' चा ट्रेंड पाहून भारावली रश्मिका मंदना

'तासंतास सराव केला...' सोशल मीडियावर 'सामी' चा ट्रेंड पाहून भारावली रश्मिका मंदना

सध्या नॅशनल क्रश असलेल्या रश्मिकाच्या ‘सामी सामी’ (Sami Sami) या गाण्यातील हूक स्टेपचा मोठा ट्रेंड सुरु आहे

    मुंबई, 28 जानेवारी : अल्लू अर्जून आणि रश्मिका मंदानाच्या  (Rashmika Mandanna) ‘पुष्पा’  (Pushpa)  या चित्रपटानं बॉक्स ऑफीसवर छप्परफाड कमाई केली. अल्लू अर्जुनची  (Allu Arjun)   रांगडी हटके स्टाईल आणि रश्मिकाच्या दमदार अभिनयानं चाहत्यांना विशेष भुरळ घातली. त्यातच सध्या नॅशनल क्रश असलेल्या रश्मिकाच्या ‘सामी सामी’ (Sami Sami)  या गाण्यातील हूक स्टेपचा मोठा ट्रेंड सुरु आहे. सोशल मीडियावर रश्मिकाच्या चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रेटीजही या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. सोशल मीडियावर सामी सामी गाण्याच्या स्टेप्सचा ट्रेंड पाहिल्यानंतर रश्मिकाने यावर प्रतिक्रिया दिली आहे. या गाण्याला सध्या भरभरून प्रेम मिळत आहे हे पाहून अतिशय आनंद होत आहे असल्याचं ती म्हणाली. तसंच हे गाणं यशस्वी करण्यासाठी तिने चाहत्यांचे आभारही मानले आहेत. रश्मिकाने सांगितलं, "या गाण्याच्या शूटिंगसाठी आम्ही तासनतास सराव केला होता. गेल्या काही दिवसांपासून या गाण्याची हूक स्टेप अनेक जण करत आहेत. ते पाहून मला या गाण्याच्या शूटिंगचे दिवस आठवत आहेत. या गाण्याला जगभरातून मिळालेल्या प्रेमामुळे हे गाणं माझ्यासाठी सुपर स्पेशल आणि संस्मरणीय बनलं आहे" 'पुष्पा' या चित्रपटात रश्मिकानं श्रीवल्लीची भूमिका साकारली आहे. 'सामी सामी' बरोबरच तिचं 'श्रीवल्ली' हे गाणंही बरंच लोकप्रिय झालं आहे. टॉलिवूड गाजवल्यानंतर रश्मिका लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘मिशन मजनू’ या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तर दुसरीकडे अमिताभ बच्चन यांच्या ‘गुडबाय’ या चित्रपटातही ती झळकणार आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, Rashmika mandanna, South actress

    पुढील बातम्या