मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /फॅट टू फिट प्रवासात अभिनेत्याची झाली अशी अवस्था; ओळखणंही झालं कठीण

फॅट टू फिट प्रवासात अभिनेत्याची झाली अशी अवस्था; ओळखणंही झालं कठीण

विजय सेतूपती

विजय सेतूपती

वाढलेलं वजन पुन्हा कंट्रोलमध्ये आणणं फार कठीण होऊन बसतं. अशाच एका अभिनेत्याची सध्या चर्चा सुरू आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 14 डिसेंबर : अनेक कलाकारांना नव्या प्रोजेक्टप्रमाणे स्वत:वर काम करावं लागतं. मग तो अभिनय असो किंवा बॉडिट्रान्सफॉर्मेशन. अनेक कलाकारांनी नव्या सिनेमासाठी स्वत:मध्ये अनेक बदल केले आहेत. भूमिकेसाठी अनेक जण आपलं वजन वाढवतात. पण वाढलेलं वजन पुन्हा कंट्रोलमध्ये आणणं फार कठीण होऊन बसतं. अशाच एका अभिनेत्याची सध्या चर्चा सुरू आहे. साऊथ अभिनेता विजय सेतूपती मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियापासून दूर आहे. विजय त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी कधीच समोर आणल्या नाहीत. दरम्यान त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विजयचा नवा फोटो पाहून सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

विजयनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या त्याच्या लेटेस्ट फोटोनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या फोटोमधील अभिनेता विजय आहे हे ओळखणं देखील कठीण झालं आहे. विजयमध्ये झालेलं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहून सगळे हैराण झाले आहेत.  विजयनं मिमिर सेल्फी क्लिक केला आहे.  क्लिन शेव विथ व्हाइट शर्टमध्ये विजय फारच हँडसम दिसत आहे. बॉडिट्रान्फर्मेशनमुळे विजयचा लुक पूर्णपणे बदलून गेला आहे. विजयनं फोटो शेअर करत काही कॅप्शन दिलेलं नाहीये. त्यामुळे विजयचं हे बॉडिट्रान्सफॉर्मेशन नक्की कशासाठी आहे हे समोर आलेलं नाही.

हेही वाचा - Ved Trailer: रितेश जेनिलियाचं 'वेड' ओरिजिनल नाही? समोर आलं चर्चेचं कारण

विजयच्या बॉडिट्रान्सफॉर्मेशनवर चाहत्यांनी भरभरून प्रेम व्यक्त केलं आहे. त्याचे सोशल मीडियावर हँडल्स पाहिले तर त्यावर केवळ सिनेमाच्या प्रमोशनच्या पोस्ट आहेत. विजयच्या वैयक्तिक आयुष्याविषयी एकही पोस्ट पाहायला मिळत नाही. असात विजयच्या या पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. एका युझरनं म्हटलंय, सर तुम्ही आधीपासून स्मॉर्ट दिसता. तर दुसऱ्या युझरनं म्हटलंय, काय चेंज झालाय. तुमच्यासारखं कोणीच नाही.  विजयच्या या पोस्टला आतापर्यंत लाखो लोकांनी लाइक केलं आहे.

अभिनेता विजय सेतूपतीची फॅन फॉलोविंग केवळ साऊथमध्ये नाही तर बॉलिवूडमध्येही आहे. डिएसपी हा त्यांचा सध्याचा शेवटचा सिनेमा आहे. यात त्यानं एका पोलीस ऑफिसरची भूमिका साकारली आहे. विक्रम वेधा या हिंदी सिनेमात त्यानं काम केलं. त्याचप्रमाणे तो लवकरच शाहीद कपूरच्या फर्जी सीरिजमध्ये दिसणार आहे. तरच शाहरुख खानबरोबर जवान सिनेमातही काम करणार आहे.

First published:

Tags: South actress, South film, South indian actor