मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Rashmika Mandanna सोबतच्या अफेअरनंतर Vijay Deverakonda कुणाला करतोय डेट? ; स्व:ता केला खुलासा

Rashmika Mandanna सोबतच्या अफेअरनंतर Vijay Deverakonda कुणाला करतोय डेट? ; स्व:ता केला खुलासा

रश्मिका मंदान्नासोबतच्या अफेअरनंतर (Vijay Deverakonda And Rashmika Mandanna)विजय देवरकोंडा कुणाला डेट करत आहे व ती  खास व्यक्ती कोण आहे याचा त्याने एक मुलाखतीवेळी खुलासा केला आहे.

रश्मिका मंदान्नासोबतच्या अफेअरनंतर (Vijay Deverakonda And Rashmika Mandanna)विजय देवरकोंडा कुणाला डेट करत आहे व ती खास व्यक्ती कोण आहे याचा त्याने एक मुलाखतीवेळी खुलासा केला आहे.

रश्मिका मंदान्नासोबतच्या अफेअरनंतर (Vijay Deverakonda And Rashmika Mandanna)विजय देवरकोंडा कुणाला डेट करत आहे व ती खास व्यक्ती कोण आहे याचा त्याने एक मुलाखतीवेळी खुलासा केला आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 8 नोव्हेंबर: साउथ सिनेसृष्टीतील (South Cinema) स्टार हॉटेस्ट अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) सध्या त्याच्या आगामी 'लिगर' (Liger) चित्रपटामुळे चर्चेत आहे. यामध्ये तो बॉक्सिंगचा गॉड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माइक टायसनसोबत (Mike Tyson) पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. दरम्यान, आता तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत (Vijay Deverakonda Personal life) आहे.खरं तर, त्याच्याबद्दल, तो कोणाला डेट करत आहे आणि त्याच्या आयुष्यातील ती खास व्यक्ती कोण आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात. अशा स्थितीत त्याला विचारण्यात आले की तो कोणाला डेट करत आहे? ज्यावर त्यानं एकदम मजशेरी असं उत्तर दिले.

आजकाल विजय देवरकोंडा भाऊ आनंद याच्या ‘Pushpaka Vimanam’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, दोन्ही भावांचा एक व्हिडीओ यूट्यूबवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते इंटरनेटवर चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत आहेत. यापैकी एक प्रश्न विजयच्या डेटिंग लाईफ (Vijay Deverakonda dating) बद्दल देखील होता. त्याला विचारण्यात आले, 'तो कुणाला डेट करत आहे, जर करत असल तर ती कोण आहे?' यावर अभिनेता मजेशीर उत्तर देतो आणि म्हणतो, 'अलीकडेच माझे हृदय तुटले आहे.' त्याचं उत्तर ऐकून सर्वजण हैराण झाले आणि त्याला पुन्हा विचारले की खरंच काय? कोणी असं केले? यावर विजयचा भाऊ आनंद उत्तर देतो की, ' ज्याप्रमाणे सिनेमात माझी लीड लेडी चित्रपटात पळून जाते अगदी तशीच.'

वाचा : Urfi Javed ची ब्रालेट घालून अजब डिमांड; नेटकऱ्यांनी दिला असा रिप्लाय...

गेल्या वर्षी अशी बातमी आली होती की विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना (Vijay Deverakonda And Rashmika Mandanna) एकमेकांना डेट करत आहेत. दोघांनी 2018 मध्ये 'गीता गोविंदम'मध्ये काम केले होते. यामध्ये त्यांच्यातील जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली, त्यानंतर खऱ्या आयुष्यातही दोघे अनेकदा एकत्र दिसले. मात्र, आतापर्यंत त्यांनी त्यांच्यातील नात्यावर कधीच खुलेपणाने बोलले नाहीत.

वाचा: Video: मित्राला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी रोहित शेट्टी थेट उल्हासनगरमध्ये

विजय देवरकोंडाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो सध्या 'लिगर' या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाद्वारे तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असून तो अनन्या पांडेसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली तयार होत आहे. नुकतीच बातमी आली होती की, त्याने चित्रपटातील सर्वोत्कृष्ट गाण्यांसाठी शूटिंगही केले आहे.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Vijay deverakonda