मुंबई, 17 जानेवारी : साऊथ फिल्मचा प्रसिद्ध अभिनेता आणि म्युझिक डायरेक्टर विजय एंटनी 2016मध्ये आलेल्या पिचाईकरन या सिनेमामुळे चांगलाच हिट झाला होता. या सिनेमाची खूप चर्चा झाली होती. याच सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान अभिनेत्याच्या बाबतीत एक वाईट घटना घडली आहे. पिचाईकरन 2च्या शुटींगवेळी अभिनेता विजय एंटनीचा अपघात झाला असून जखमी झाला आहे. सिनेमात अँक्शन सीनचं शुटींग करताना त्याचा अपघात झालाय. त्याला उपचारांसाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातावेळी अभिनेता विजय समुद्रात बोट चालवत होता. सीन करतेवेळी एक मोठी बोट शुटींगच्या बोटीला धडकली. ज्यात अभिनेता विजय जखमी झाला. मोठी नाव शुटींगच्या नावेला धडकल्यानं विजयचं बोटीवरील नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला. अभिनेत्याच्या अपघाताची माहिती मिळताच त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात नेताच अभिनेत्याला अपघातात जास्त इजा झाली नसल्याचं समोर आलं. अभिनेत्याला रुग्णालयात नेताच त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला कुआलालंपुरच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
Happy to share that @vijayantony is fast recovering from the accident injury. He is under observation at the hospital at #Langkawi & his family has reached and with him. They will take a call to bring him to Chennai soon.
Let's pray for his speedy recovery & back in action 🙏 — Dr. Dhananjayan BOFTA (@Dhananjayang) January 17, 2023
अभिनेत्यावर उपचार करत असलेले डॉ.धनंजयन बोफटा यांनी ट्विट करत विजयची हेल्थ अपडेट दिली. त्यांनी म्हटलं, 'अभिनेता विजय दुखापतीतून वेगानं बरा होत आहे हे सांगण्यास आनंद होतं आहे. डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.त्याचे कुटुंब त्याच्यापर्यंत पोहोचले आहेत. त्याला लवकरच चेन्नईला आणण्यात येणार आहे. तो लवकर बरा व्हावा आणि त्याच्या अँक्शन मोडमध्ये परत यावा यासाठी सर्वांनी प्रार्थना करूया'.
पिचाईकरन मध्ये अभिनेता विजय प्रमुख भूमिकेत होता. सिनेमात एका अरबपती बिझनेसमॅनची कहाणी दाखवण्यात आली होती. लाखो संपत्तीचा मालक असलेला विजय जो मृत्यूच्या दारात असलेल्या आपल्या आईला वाचवण्यासाठी पवित्र बलिदान म्हणून48 दिवस एका भिकाऱ्याच्या रुपात राहतो. पिचाईकरन 2मध्ये मात्र अभिनेता विजय दिग्दर्शन करणार आहे. त्याप्रमाणे सिनेमाच्या साउंडट्रॅकवरही काम करत आहे. सिनेमात अभिनेता जॉन विजय, हरीश बेराडी, वाईजी महेंद्रन, अजय घोष आणि योगी बाबू दिसणार आहेत.
अभिनेता विजय एंटनीच्या वर्कफ्रंट विषयी सांगायचं झालं तर, या आधी तो 'अग्नी सिरकुगल' सिनेमात दिसला होता. सिनेमात त्यान अरुण विजयबरोबर स्क्रिन शेअर केली होती. या सिनेमाला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: South film, South indian actor