मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

समंथा नंतर नागा चैतन्यच्या आयुष्यात पुन्हा फुलली प्रेमाची पालवी; 'या' अभिनेत्रीला करतोय डेट

समंथा नंतर नागा चैतन्यच्या आयुष्यात पुन्हा फुलली प्रेमाची पालवी; 'या' अभिनेत्रीला करतोय डेट

समंथा नंतर नागा चैतन्यच्या आयुष्यात पुन्हा फुलली प्रेमाची पालवी; 'या' अभिनेत्रीला करतोय डेट

समंथा नंतर नागा चैतन्यच्या आयुष्यात पुन्हा फुलली प्रेमाची पालवी; 'या' अभिनेत्रीला करतोय डेट

अभिनेता नागा चैतन्य त्याच्या समंथाबरोबर झालेल्या घटस्फोटोनंतर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ही चर्चा त्याच्या आणि समंथाची नसून नागाच्या नव्या प्रेमाची आहे. अभिनेता पुन्हा प्रेमात पडला असून एका अभिनेत्रीबरोबर डेट करत आहे.

    मुंबई, 20 जून: साऊथ सिनसृष्टीतील प्रसिद्ध कपल असलेल्या समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि नागा चैतन्य ( Naga Chaitanya)  यांच्या घटस्फोटानंतर  दोघांनी सध्या त्यांच्या प्रोफेशनल लाईफवर फोकस केल्याचं पाहायला मिळत आहे. दोघांचा घटस्फोट हा त्यांच्या चाहत्यांसाठी फार मोठा धक्का होता. मात्र दोघेही आता त्यांच्या आयुष्यात पुढे गेले असून वैयक्तिक आणि प्रोफेशनल लाईफमध्ये सक्सेस होतोना दिसत आहेत. अभिनेता नागा चैतन्य संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. खरंतर समंथाबरोबर घटस्फोट झाल्यानंतर नागा चैतन्यला फार त्रास झाला होता. मात्र समंथानंतर नागाच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाची पालवी फुलली आहे. भुतकाळ विसरुन नागा पुन्हा प्रेमात पडला आहे. त्याच्या चाहत्यांसाठी ही फार आनंदाची बातमी ठरली आहे. बॉलिवूड लाईफने दिलेल्या माहितीनुसार, नागा चैतन्य सध्या साऊथ अभिनेत्री शोभिता धुलीपाला (Sobhita Dhulipala)  बरोबर डेट करत आहे. दोघांना नुकतचं हैद्राबाद येथे एकत्र स्पॉट करण्यात आलं. हैद्राबाद येथे नागाला नवा फ्लॅट मिळणार आहे.  त्या फ्लॅटचं सध्या काम सुरू असून  तो पाहण्यासाठी दोघे गेले होते. शोभिता ही नागाच्या नुकत्याच आलेल्या 'मेजर' या सिनेमात होती. हेही वाचा -  Gangs Of Wasseypur च्या 'त्या' सीनची चर्चा! बॉलिवूडमध्ये Female Representation आहे कुठे? बॉलिवूड लाईफच्या माहितीनुसार, नागा चैतन्य आणि शोभिता एकमेकांबरोबर फार खुश असतात. त्यांना एकमेकांची कंपनी आवडते. दोघांनी नागाच्या घरी क्वॉलिटी टाईम घालवला आहे. नागानं तिला त्याच्या आलिशान घराची सैरी घडवली. त्यानंतर दोघेही कारनं जाताना स्पॉट झाले. त्यामुळे नागा चैतन्य आणि शोभिता यांच्या नात्याविषयीच्या चर्चा वाढल्या आहे. नागा चैतन्य आणि शोभिताला हैद्राबादच्या हॉटेलमध्ये अनेकदा स्पॉट करण्यात आलं आहे. मेजर सिनेमाच्या प्रमोशनसाठीही ते तिथेच थांबले होते. शोभितानं तिचा वाढदिवसही तिथेच साजरा केला होता.  आपण पाहिलं तर नागा चैतन्यनं त्याच वैयक्तिक आयुष्य सोशल मीडियापासून दूर ठेवलंय. त्यामुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी फार कमी गोष्टी समोर येतात. समंथा प्रभू आणि नागा चैतन्य यांनी ऑक्टोबर 2021मध्ये घटस्फोट घेतला. लग्नाच्या ४ वर्षांनी दोघांनी घेतलेला हा निर्णय त्यांच्या चाहत्यांसाठी फार धक्कादायक होता. सोशल मीडियावर आजही दोघांच्या घटस्फोटाची चर्चा आहे. दोघांच्या वर्क फ्रंट विषयी बोलायंच झालं तर नागा चैतन्य आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तर समंथा 'शंकुतलम' आणि 'यशोदा' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
    Published by:Minal Gurav
    First published:

    Tags: South actress, South film, South indian actor

    पुढील बातम्या