• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • पुराच्या पाण्यात बुडाला 'मास्टर' Vijay च्या 'Beast' चा सेट; शूटिंगवर झाला मोठा परिणाम

पुराच्या पाण्यात बुडाला 'मास्टर' Vijay च्या 'Beast' चा सेट; शूटिंगवर झाला मोठा परिणाम

तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये (Chennai Flood 2021) मुसळधार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील अनेक भागात पाणी तुंबले असून त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. अनेकांच्या घरात पाणी साचल्याची परिस्थिती आहे. इतकंच नाही तर साऊथचा सुपरस्टार प्रसिद्ध अभिनेता विजयचा (Vijay) आगामी चित्रपट 'बीस्ट' (Beast) च्या सेटवरही पुराचे पाणी पोहोचले आहे.

 • Share this:
  मुंबई, 13 नोव्हेंबर-  तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये  (Chennai Flood 2021) मुसळधार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील अनेक भागात पाणी तुंबले असून त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. अनेकांच्या घरात पाणी साचल्याची परिस्थिती आहे. इतकंच नाही तर साऊथचा सुपरस्टार प्रसिद्ध अभिनेता विजयचा  (Vijay)  आगामी चित्रपट 'बीस्ट'   (Beast)  च्या सेटवरही पुराचे पाणी पोहोचले आहे. त्यामुळे चित्रपटाच्या शूटिंगवर त्याचा परिणाम झाला आहे. 'बीस्ट'चा सेट- 'बीस्ट'च्या निर्मात्यांनी चेन्नईतील एका शॉपिंग मॉलमध्ये चित्रपटाचा सेट उभारला होता. ज्याचे शूटिंग गेल्या काही आठवड्यांपासून सुरू आहे. मात्र संततधार पावसाने संपूर्ण शहरात पाणी साचलंय. चेन्नईतील फिल्म स्टुडिओमध्ये बांधण्यात आलेल्या 'बीस्ट'च्या सेटवरही पुराचा तडाखा बसला आहे. मात्र सुदैवाने या ठिकाणी कोणतीही हानी झालेली नाही. अनेक लोक चित्रपटाच्या सेटचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. ज्यामध्ये पुराचं पाणी स्पष्ट दिसत आहे. 'बीस्ट'मध्ये आहे तगडी स्टारकास्ट- चेन्नईतील पुरामुळे 'बीस्ट'च्या चित्रीकरणाची प्रक्रिया मंदावली असून, शहराची स्थिती सुधारली नाही तर शूटिंग पुढे जाऊ शकते. अलीकडेच अभिनेत्री पूजा हेगडे देखील चित्रपटाच्या पुढील शेड्यूलसाठी चेन्नईला पोहोचली आहे. नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित 'बीस्ट'मध्ये विजय आणि पूजा हेगडे यांच्याशिवाय अपर्णा दास, शाइन टॉम चाको, सेल्वाराघवन, योगी बाबू, रॅडिन किंग्सले यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. काय आहे कथा- या चित्रपटाची कथा सोन्याच्या तस्करीवर आधारित असून विजय 'बीस्ट'मध्ये नव्या भूमिकेत दिसणार आहे. विजय शेवटचा 'मास्टर' या सुपरहिट चित्रपटात दिसला होता. 135 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जवळपास 300 कोटींचा व्यवसाय केला होता. आता त्याचा आगामी 'बीस्ट' हा चित्रपट प्रेक्षकांना कितपत प्रभावित करतो हे पाहावे लागेल. द बीस्टची निर्मिती सन पिक्चर्स करत असून संगीत अनिरुद्ध रविचंदर यांनी दिले आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: