Home /News /entertainment /

चित्रपटांमध्ये डान्स स्टेप शिकण्यासाठी Jr. NTR करतो असं काही, साऊथ कोरियोग्राफरचा खुलासा

चित्रपटांमध्ये डान्स स्टेप शिकण्यासाठी Jr. NTR करतो असं काही, साऊथ कोरियोग्राफरचा खुलासा

एसएस राजामौली यांच्या आरआरआरमध्ये कोमाराम भीमची भूमिका साकारल्यानंतर, ज्युनियर एनटीआरची (Jr. NTR) जगभरात एक खास ओळख निर्माण झाली आहे. राम चरणसोबत चित्रपटात त्याच्या डान्स स्टेप तर प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडल्या होत्या.

    मुंबई, 10 मे- सध्या जगभरात साऊथ चित्रपटांनी (South Cinema)  धुमाकूळ घातला आहे. साऊथ अभिनेत्यांचा जगभरात चाहतावर्ग पाहायला मिळत आहे. असं असताना देशात मात्र साऊथ व्हर्सेस बॉलिवूड असं युद्धसुद्धा रंगलं आहे. त्यामुळे साऊथ अभिनेते सतत चर्चेत आहेत. दरम्यान एसएस राजामौली यांच्या आरआरआरमध्ये कोमाराम भीमची भूमिका साकारल्यानंतर, ज्युनियर एनटीआरची (Jr. NTR) जगभरात एक खास ओळख निर्माण झाली आहे. राम चरणसोबत चित्रपटात त्याच्या डान्स स्टेप तर प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडल्या होत्या. ज्याला पाहून प्रत्येकजण थिरकताना दिसून येत होता. अभिनेत्याचं डान्सिंग   (Jr.NTR Dance)  स्किल सर्वानांच भावलं आहे. साउथचे प्रसिद्ध कोरियोग्राफरसुद्धा त्याच्याकडे नो-रिहर्सल स्टार म्हणून पाहतात. साऊथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कोरियोग्राफर शेखर मास्टर यांनी नुकतंच एका माध्यमाशी संवाद साधला.यावेळी त्यांनी सांगितलं की, 'RRR स्टार' तारक अर्थातच Jr. NTR हा एक असा अभिनेता आहे, ज्याला तालीमची गरज नाही. तो केवळ त्याच्या स्वत: च्या निरीक्षणानुसार डान्स मूव्ह करू शकतो. तसेच Jr. NTR सिंगल टेक-डान्सर आहे. शेखर मास्टर यांच्या मते, 'जर कोणी असा अभिनेता असेल ज्याला रिहर्सल करायची नाहीय, तर तो Jr. NTR आहे. तो त्याच्या डान्स स्ट्राइकमध्येही करत नाही. त्याला फक्त एक दृष्टीक्षेप आवश्यक आहे आणि तो समोरच्या व्यक्तीचा डान्स पूर्णपणे कॉपी करण्यास सक्षम आहे. तसेच Jr. NTR ने RRR च्या प्रमोशन दरम्यान आपल्या हटके डान्स मूव्ह्सने सर्वांना वेड लावलं होतं. एसएस राजामौली यांच्या 'RRR' च्या तुफान यशानंतर, Jr. NTR आता 'NTR 30' या कोरटाला शिवा दिग्दर्शित चित्रपटात दिसणार आहे. त्यासाठी त्याने आपल्या बॉडीवरही मेहनत घ्यायला सुरुवात केली आहे. या चित्रपटाशिवाय त्याच्याकडे 'NTR 31' हा चित्रपटदेखील आहे या चित्रपटाचं दिग्दर्शन KGF फेम दिग्दर्शक प्रशांत नील करणार आहेत. हा एक कमर्शिअल ड्रामा मुव्ही असणार आहे. या चित्रपटात RRR स्टार Jr. NTR सोबत प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री असणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मेकर्स तारकच्या वाढदिवसादिवशी अर्थातच 20 मे रोजी काही मोठ्या अपडेट्स देण्याची योजना आखत आहेत. कदाचित त्याच्या वाढदिवसाला NTR31 चे पहिले पोस्टर समोर येईल.चाहते तारकला पुन्हा नव्याने पडद्यावर पाहण्यासाठी फारच उत्सुक आहेत. तारकची नवी भूमिका चाहत्यांना कितपत आवडते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, South indian actor

    पुढील बातम्या