मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Sooryavanshi Box Office Collection Day 1: अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी'ने पहिल्याच दिवशी जमवला कोट्यवधींचा गल्ला

Sooryavanshi Box Office Collection Day 1: अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी'ने पहिल्याच दिवशी जमवला कोट्यवधींचा गल्ला

Ranveer Singh

Ranveer Singh

अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) स्टारर 'सूर्यवंशी' (Sooryavanshi) चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

मुंबई, 6 नोव्हेंबर- अक्षय कुमार  (Akshay Kumar)  आणि कतरिना कैफ  (Katrina Kaif)  स्टारर 'सूर्यवंशी'  (Sooryavanshi) चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागली. लॉकडाऊननंतर चित्रपटगृहे उघडल्यानंतर प्रदर्शित होणारा 'सूर्यवंशी' हा एक मोठा चित्रपट आहे. सूर्यवंशीला महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश आदी राज्यांत चांगला प्रतिसाद मिळत आहे. मोठ्या संख्येने प्रेक्षक चित्रपटगृहांकडे वळले आहेत.

अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी' आंतरराष्ट्रीय स्तरावर 66 देशांमध्ये 1300 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. या देशांमध्ये उत्तर अमेरिका, यूएई, ऑस्ट्रेलिया, जपान आणि चीन सारख्या इतर अनेक देशांचा समावेश आहे. हा एक विक्रम आहे. 'सूर्यवंशी' भारतात 4 हजार स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. यासाठी, निर्मात्यांनी देशातील तीन प्रमुख मल्टिप्लेक्स - पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलिससह करारानंतर चित्रपट प्रदर्शित केला आहे.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श 'सूर्यवंशी'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर म्हणाले, 'ही चांगली सुरुवात आहे. चित्रपट व्यवसायाचा मोठा भाग असलेल्या महाराष्ट्रात अजूनही 50 टक्के वहिवाट लागू आहे. या राज्यातून चित्रपट उद्योगाला 35-40 टक्के व्यवसाय मिळतो. त्याचवेळी कोमल नाहटा सांगतात की, महाराष्ट्र, गोवा, बिहार, झारखंड आणि हरियाणामध्ये अजूनही 50 टक्के बसण्याची क्षमता आहे.

'सूर्यवंशी'चे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले आहे. 'सिंघम' आणि 'सिम्बा' नंतर हा चित्रपट तिसरा कॉप युनिव्हर्स इन्स्टॉलमेंट आहे. सूर्यवंशी अॅक्शन, रोमान्स, कॉमेडी, ड्रामा आणि साहसाने परिपूर्ण आहे. या चित्रपटात कतरिना कैफ आणि अक्षय कुमार यांच्याशिवाय अजय देवगण आणि रणवीर सिंग यांचाही मोठा कॅमिओ आहे. जे प्रेक्षकांना पूर्ण मनोरंजनाचा डोस देत आहे. अक्षय अजय आणि रणवीरसोबत अॅक्शन करताना दिसला आहे.

(हे वाचा:रिलीजच्या पहिल्याच दिवशी 'Sooryavanshi' झाला Leak! रोहित शेट्टीला बसू शकतो ....)

मात्र हा चित्रपट प्रदर्शित होताच रोहित शेट्टीचं टेन्शन आणखी वाढ ल्याचं समोर आलं होतं. कारण हा चित्रपट ऑनलाइन लीक झाल्याची बातमी समोर आली होती. ज्या वेबसाइट्सवर हा सिनेमा लीक झाला आहे. त्यामध्ये तमिळ रॉकर्सच्या नावाचाही समावेश आहे. ही साइट या प्रकरणांमध्ये सर्वात वर आहे. याशिवाय हा चित्रपट टेलिग्रामच्या अनेक चॅनेलवर आणि Filmy Zilla नावाच्या वेबसाइटवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. हा चित्रपट सर्व साइट्सवर एचडी प्रिंटमध्ये डाउनलोड केला जाऊ शकतो.चित्रपट लीक झाल्याची बातमी आल्यापासून निर्माते चिंतेत असल्याचं म्हटलं जात होतं. कारण चित्रपट लीक झाल्यास निर्मात्यांना करोडोंचा फटका बसू शकतो. रोहित शेट्टीचा हा मल्टीस्टारर चित्रपट बनवण्यासाठी 225 कोटी रुपयांचा खर्च आला आहे.मात्र पहिल्या कमाई पाहता निर्मात्यांना दिलासा मिळाला असणार हे नक्की

First published:

Tags: Bollywood News, Entertainment