'आवो फिरसे जहर वाली खीर पीने'

'आवो फिरसे जहर वाली खीर पीने'

या सिनेमाची इतकी चर्चा होण्याचे कारण म्हणजे, हा सिनेमा सलग तब्बल 18 वर्षांपासून सेट मॅक्स या वाहिनीवर दाखवण्यात येतोय

  • Share this:

23 मे : नुकत्याच झालेल्या आयपीएल-10 वेळी खेळाडूंच्या कामगिरीपेक्षा अधिक चर्चा झाली ती सेट मॅक्सवर सतत दाखवल्या जाणाऱ्या 'सुर्यवंशम' चित्रपटाबद्दल. सोशल मीडियावर तर याबाबतच्या विनोदांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. आणि आता फायनल संपताच पुन्हा एकदा नेटीझन्स 'सुर्यवंशम' या सिनेमाबाबत ट्विट करू लागलेत. 'हिरा ठाकूर उन्हाळ्याच्या सुट्टीवरून परतत आहे, त्याच्या स्वागतासाठी तयार रहा'असं म्हणत काहींनी त्याची खिल्ली उडवलीय.

या सिनेमाची इतकी चर्चा होण्याचे कारण म्हणजे, हा सिनेमा सलग तब्बल 18 वर्षांपासून सेट मॅक्स या वाहिनीवर दाखवण्यात येतोय. यामागचं कारण आहे ते म्हणजे, या वाहिनीने 'सूर्यवंशम' बाबतचे सर्व हक्क 100 वर्षांसाठी विकत घेतले आहेत. खरंतर हा सिनेमा आला तेव्हा फ्लॉप ठरला होता. आता मात्र, सतत दाखवला जात असल्याने अनेक प्रेक्षकांचे तर या सिनेमातील सर्वच्या सर्व डायलॉग तोंडपाठच झालेत. अमिताभ बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारलेला हा सिनेमा १९९९ साली प्रदर्शित झाला होता.

सोशल मीडिया कधी कुणाला टार्गेट करेन याचा काही नेम नाही, असंच हे सर्व गमंतीशीर ट्विट्स पाहिल्यानंतर म्हणावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2017 08:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading