Home /News /entertainment /

अभिनेता सूरज थापरची प्रकृती गंभीर; मुंबईत येताच ICU मध्ये केलं भरती

अभिनेता सूरज थापरची प्रकृती गंभीर; मुंबईत येताच ICU मध्ये केलं भरती

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याची कोरोना टेस्ट देखील घेण्यात आली आहे. शिवाय त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व मंडळींना क्वारंटिनमध्ये ठेवण्यात आलं आहे.

    मुंबई 8 मे: प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सूरज थापर (Sooraj Thapar) याची प्रकृती गंभीर आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्याला ताप येत होता. मात्र तरी देखील डॉक्टरांची औषधं घेऊन तो गोव्यात चित्रीकरण करत होता. दरम्यान त्याची प्रकृती आणखी बिघडली. परिणामी मुंबईत परत येताच त्याला रुग्णालयात भरती करण्यात आलं. सध्या ICUमध्ये त्याच्यावर उपचार सुरु आहेत. (Sooraj Thapar admitted in ICU) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याची कोरोना टेस्ट देखील घेण्यात आली आहे. शिवाय त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व मंडळींना क्वारंटिनमध्ये ठेवण्यात आलं आहे. सूरजची बहिण वनिता हिनं नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या प्रकृतीविषयी माहिती दिली. ती म्हणाली, मुंबईत परतताच विमानतळावरच त्याच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. शिवाय त्याच्या शरीरातील ऑक्सिजन आणि पल्स रेटही चेक करण्यात आलं. मात्र कोरोनाचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही. परंतु त्याच्या शरीरातील ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्यामुळं त्वरीत त्याला ICU मध्ये भरती करण्यात आलं. पाहा मजेशीर Video; स्वामींचं नाव घेत अंकिता लोखंडेनं घेतली कोरोना लस शिवाय पुढे ती म्हणाली, “गोव्यात शूटिंग करत असताना त्यानं कोरोनाचे सर्व नियम अगदी काटेकोरपणे पाळले आहेत. जो पर्यंत त्याच्या सीनसाठी त्याला बोलावलं जात नव्हतं तो पर्यंत तो आपल्या रुममध्येच थांबत असे. तरी देखील त्याची तब्येत बिघडली. कदाचित बदललेल्या हवामानामुळं त्याला ताप आला असावा असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. परंतु सर्व रिपोर्ट आल्यावरच खरं कारण स्पष्ट होईल.” सूरजनं आजवर अनेक सुपरहिट मालिकांमध्ये काम केलं आहे. परंतु प्रामुख्यानं  ‘ससुराल गेंदा फूल’, ‘एक नई पहचान’ आणि ‘छल-शह और मात’ या त्याच्या मालिका विशेष गाजल्या. सध्या तो शौर्य आणि अनोखी या दोन मालिकांमध्ये काम करताना दिसत आहे.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Corona hotspot, Coronavirus

    पुढील बातम्या