Indian Idol 10 : विजेता सलमान अलीला मिळाला 'हा' मोठा पुरस्कार

Indian Idol 10 : विजेता सलमान अलीला मिळाला 'हा' मोठा पुरस्कार

जवळजवळ गेले तीन महिने सोनीवर इंडियन आयडाॅल 10 शो सुरू होता. देशभरातले एकापेक्षा एक सुरेल गायक-गायिकांमध्ये ही स्पर्धा होती. अखेर या स्पर्धेचा विजेता घोषित केला गेलाय.

  • Share this:

मुंबई, 24 डिसेंबर : जवळजवळ गेले तीन महिने सोनीवर इंडियन आयडाॅल 10 शो सुरू होता. देशभरातले एकापेक्षा एक सुरेल गायक-गायिकांमध्ये ही स्पर्धा होती. अखेर या स्पर्धेचा विजेता घोषित केला गेलाय.

हरयाणाचा सलमान अली या सुरांचा विजेता ठरलाय. तर हिमाचल प्रदेशचा अंकुश भारद्वाज रनरअप घोषित झालाय. या फिनालेपर्यंत अंकुश भारद्वाज,नितिन कुमार, नीलांजना राय आणि  विभोर पाराशर पोचले होते. यावेळी लाइव्ह व्होटिंग झालं. सलमानला 25 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले.

हा सीझन मनीष पॉलनं होस्ट केला होता.  विशाल डडलानी, नेहा कक्कड आणि जावेद अली यावेळचे जज होते. अनु मलिकच्या जागी जावेद अलीला  रिप्लेस केलं होतं. कारण अनु मलिकवर #MeTooचा आरोप लागला होता.

या ग्रँड फिनालेला झीरो सिनोमाची टीम आली होती. शाहरुख खान, अनुष्का आणि कतरिना रिक्षातून सेटवर पोचले होते. तिघांनी मनीषसोबत खूप धमाल केली होती.

प्रियांका चोप्रानं केलं सर्वात स्टाइलिश व्यक्तीला किस, Photos व्हायरल

First published: December 24, 2018, 12:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading