मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

बाजीप्रभूंच्या बलिदानानं पावन होणार घोडखिंड; पाहा 'स्वराज्यजननी जिजामाता'चा विशेष भाग

बाजीप्रभूंच्या बलिदानानं पावन होणार घोडखिंड; पाहा 'स्वराज्यजननी जिजामाता'चा विशेष भाग

‘स्वराज्यजननी जिजामाता’ (Swarajya Janani Jijamata) मध्ये पावनखिंडीची (Pawankhind) यशस्वी लढाई तसेच महाराजांची पन्हाळ्यावरून सुटका हा विशेष भाग रंगणार आहे.

  • Published by:  News Digital

मुंबई 16 मे :  सोनी मराठी (Sony Marathi) वरील लोकप्रिय मालिका ‘स्वराज्यजननी जिजामाता’ (Swarajya Janani Jijamata) मध्ये पावनखिंडीची (Pawankhind) यशस्वी लढाई तसेच महाराजांची पन्हाळ्यावरून सुटका हा विशेष भाग रंगणार आहे. या भागाचा एक प्रोमो ही समोर आला आहे. त्यामुळे याविषयी आता प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

वीर बाजीप्रभू देशपांडे (Bajiparabhu Deshpande) यांनी घोडखिंड लढवली होती. तर आपले प्राण जाईपर्यत शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी हार माणली नाही. आणि अखेर घोडखिंड लढवण्यात मावळ्यांना यश आलं. महारांजांनी पन्हाळा किल्ल्यावरून आपली सुटका केली. पण या सगळ्यात वीर बाजीप्रभू यांच्या प्राणाची बाजी लागली व त्यात त्यांना वीरमरण आलं. यानंतर घोडखिंडीची बाजीप्रभू यांच्या बलिदानाने पावनखिंड झाली. असा इतिहास आता मालिकेतही पाहायला मिळणार आहे.

‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिका गेली अनेक महिने प्रेक्षकांना मनोरंजनासोबतच इतिहास सांगत आहे. अभिनेत्री नीना कुलकर्णी (Neena Kulkarni) या मालिकेत माता जिजाबाई हे पात्र साकारत आहेत. तर डॉ अमोल कोल्हे (Amol Kolhe) छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहेत.

हे वाचा - Radhe पायरेडेट पाहू नका... अन्यथा सायबर सेल करेल तुमच्यावर अशी कारवाई

सोनी मराठी वर येत्या 16 मे रोजी या मालिकेचा विशेष भाग रंगणार आहे. संध्याकाळी 7 वाजता हा विशेष भाग सुरू होईल. पावनखिंडीचा अजरामर इतिहास त्यात वीर बाजीप्रभू देशपांडेनी लावलेली जीवाची बाजी हा मालिकेचा सध्याचा ट्रॅक सुरू आहे.

या भागाच विशेष बाबी लक्षात घेऊन चित्रिकरण करण्त आलं होतं. याचे काही व्हिडीओ देखिल समोर आले होते. चित्तथरारक अशा या ऐतिहासिक प्रसंगाचं चित्रिकरणही तितकचं अवघड होतं. स्वतः नीना कुलकर्णी यांनी याचं वर्णन केलं आहे.

First published:

Tags: Chhatrapati shivaji maharaj, Marathi entertainment