Home /News /entertainment /

'आई माझी काळूबाई' पडद्यामागे कलाकार कशी करतात धम्माल, VIDEO आला समोर

'आई माझी काळूबाई' पडद्यामागे कलाकार कशी करतात धम्माल, VIDEO आला समोर

‘आई माझी काळूबाई’ (Aai mazi kalubai) या मालिकेचे कलाकार शूटींग व्यतिरिक्त इतर वेळात भन्नाट व्हिडीओज तसेच डान्स , मस्ती करत असतात. असाच एक भन्नाट व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला आहे.

  मुंबई, १० एप्रिल – मालिकांमधील कलाकार पडद्यावर एकमेकांशी कितीही भांडत असले तरीही पडद्यामागे त्यांची भन्नाट धमाल सुरू असते. सोनी मराठी (sony Marathi) वाहिनी वरील मालिका ‘आई माझी काळूबाई’ (Aai mazi kalubai) या मालिकेचे कलाकार शूटींग व्यतिरिक्त इतर वेळात भन्नाट व्हिडीओज तसेच डान्स , मस्ती करत असतात. असाच एक भन्नाट व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला आहे. याशिवाय नेहमीच ते असे पोस्ट करताना दिसतात.

  डॉक्टर करणार आणखी एक खून? ‘देवमाणूस’मध्ये मायरा झाली किडनॅप

  आई माझी काळूबाई ही मालिका सुरू झाल्यापासूनच चर्चेत आहे. तर मालिकेतील मुख्य अभिनेत्री तिसऱ्यांदा बदलल्याने काही दिवसांपूर्वीच मालिका पुन्हा चर्चेत आली होती. सध्या मालिकेचे चित्रिकरण हे सातारा जिल्ह्यात सुरु आहे. त्यामुळे मालिकेचे कलाकार इतर वेळेत एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसतात. नुकताच मालिकेतील मुख्य अभिनेता विवेक सांगळे (vivek sangale) म्हणजेच मालिकेतील अमोघ ने मालती, अमोघ, शालिनी, सई, मिलिंद, आर्या, सुशिला यांचा एक धमाल डान्स व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात ते सगळेच डान्स करत आहेत पण मध्येच त्यांची स्टेप चुकते.
  याखेरिज अन्य भन्नाट व्हिडीओ, रिल्स ते बनवत असतात.
  मालिकेत सध्या आर्याच्या आईबाबांची विराटच्या तावडीतून सुटका झाली आहे. व संपूर्ण पुरोहीत कुटुंब मंदा सह एकत्र आलं आहे. दुसरीकडे सईचं खरं रूप सगळ्यांसमोर आलं आहे. त्यामुळे तिची आता पाटलांच्या घरातून हकालपट्टी करण्यात आली. पण मालती मात्र अजूनही तिच्या संपर्कात आहे. तीने सांगितलेल्या गोष्टी ऐकते. त्या दोघींनीही आता आर्याशी चांगलं वागून तिचा काटा काढण्याचा प्लॅन केलाय. तेव्हा आता आर्या मालतीच्या जाळ्यात अडकणार का की देवी काळीबाई पुन्हा आर्याच्या रक्षणाला येणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या