मुंबई 20 जून : सोनी मराठी (Sony Marathi) वाहिनी लवकरच ‘गाथा नवनाथांची’ (Gatha Navnathanchi) ही नवी मालिका घेऊन येत आहे. टेलिव्हिझनच्या इतिहासात पहिल्यांदाच नाथ साप्रंदायावर (Nath Sampraday) मालिका बनत आहे. त्यामुळे प्रेक्षकांनाही मालिकेविषयी प्रचंड उत्सुकता आहे. तर आता या मालिकेच्या शिर्षक गीताचं मेकिंग प्रदर्शित करण्यात आलं आहे.
बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कैलाश खेर (Kailash Kher) यांनी हे शिर्षक गीत गायलं आहे. मालिकेचं शीर्षकगीत गुरू ठाकूर (Guru Thakur) यांनी लिहिले आहे तर पंकज पडघण यांनी ते संगीतबद्ध केलं आहे. कैलाश खैर यांच्या आवाजातील गाण असल्याने प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे.
View this post on Instagram
सध्या अनेक पौराणिक मालिका टीव्ही वर येत आहेत त्यात आता या नव्या मालिकेचीही भर पडत आहे. पण कधीही न पाहिलेली ही मालिका असणार आहे. नवनाथ ग्रंथाचं अनेकांच्या घरी पारायण केलं जातं. पण टीव्ही वर पडद्यावर कधीही न पाहिलेली गोष्ट पाहायला मिळणार आहे.
View this post on Instagram
मालिकेचा प्रोमो फार आधीच प्रदर्शित झाला होता. तर 21 मे लाच मालिका टीव्हीवर दिसणार देखील होती. पण लॉकडाउनमुळे ते रद्द करण्यात आलं होतं. व आता 21 जून पासून मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालिकेच्या प्रोमोमध्ये अतिशय पुरातन काळ दाखवण्यात आला आहे. तर अलख निरंजनच्या घोषणा ऐकू येत आहेत.
अजय देवगणने नव्या घरासाठी घेतलं कोट्यावधींचं कर्ज; अलिशान बंगल्याची किंमत ऐकून व्हाल थक्क
मालिकेतील वेशभूषा, बोलीभाषा, राहणीमान हे पूर्णपणे वेगळं असणार आहे. त्यामुळे पौराणिक मालिका आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी ही नक्कीच पर्वणी ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.