• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 'ज्ञानेश्वर माउलींनी भिंत चालवली पाहा अशी पाहा VIDEO; नव्या मालिकेत दिसणार स्पेशल इफेक्ट्स

'ज्ञानेश्वर माउलींनी भिंत चालवली पाहा अशी पाहा VIDEO; नव्या मालिकेत दिसणार स्पेशल इफेक्ट्स

सध्या सगळीकडे सोनी मराठी (Sony Marathi) वाहिनीवरी 27 सप्टेंबरपासून संध्याकाळी 7 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणारी नवी 'ज्ञानेश्वर माउली' (Dnyaneshwar Mauli) याची चर्चा रंगली आहे. संत ज्ञानेश्वर यांनी भिंत कशी चालवली तसेच मुक्ताईने ज्ञानेश्वर माउलींच्या पाठीवर मांडे कसे भाजले, रेड्याच्या तोंडून वेद कसे वधवून घेतले हे फक्त आपण ऐकले व वाचले असेल मात्र आता या दिव्यत्वाचे दर्शन या मालिकेतून आपणास पाहता व अनुभवयास मिळणार आहे.

 • Share this:
  मुंबई, 24 सप्टेंबर 2021 ; सध्या सगळीकडे सोनी मराठी (Sony Marathi) वाहिनीवरी 27 सप्टेंबरपासून संध्याकाळी 7 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणारी नवी 'ज्ञानेश्वर माउली'  (Dnyaneshwar Mauli) याची चर्चा रंगली आहे. माउलींची चरित्रगाथा या मालिकेतून उलगडणार आहे. या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना दिव्यत्वाचे दर्शन अनुभवास मिळणार आहे. संत ज्ञानेश्वर यांनी भिंत कशी चालवली तसेच मुक्ताईने ज्ञानेश्वर माउलींच्या पाठीवर मांडे कसे भाजले, रेड्याच्या तोंडून वेद कसे वधवून घेतले हे फक्त आपण ऐकले व वाचले असेल मात्र आता या दिव्यत्वाचे दर्शन या मालिकेतून आपणास पाहता व अनुभवयास मिळणार आहे. 2021 हे ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधीचं 725 वं वर्ष आहे. सोनी मराठी वाहिनीने 'ज्ञानेश्वर माउली' या मालिकेतील काही व्हिडिओ शेअर केले आहेत. यामध्ये संत ज्ञानेश्वर यांनी भिंत कशी चालवली तसेच मुक्ताईने ज्ञानेश्वर माउलींच्या पाठीवर मांडे कसे भाजले हे दाखवण्यात आले आहे. मालिकेतील हे क्षण पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागली आहे. आता फक्त मालिका सुरू होण्यासाठी दोन दिवस वाट पाहावी लागणार आहे. कारण 27 तारखेपासून ही मालिका आपल्या भेटीला आहे. या चरित्रगाथेतील चमत्कार ग्राफिक्सद्वारे चित्रित होणार आहे. वाचा : Bigg Boss Marathi: तिसऱ्या पर्वाचं सर्वात मोठं सरप्राईज; पाहा काय आहे'Temptation Room'चं वैशिष्ट्य दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर यांनी या मालिकेची निर्मिती केली. दिगपालया मालिकेचं दिग्दर्शनही करणार आहेत. चिन्मय आणि दिगपाल यांनी आत्तापर्यंत अनेक ऐतिहासिक कलाकृती घडवल्या आहेत. हे दोघंही एखादी कलाकृती अतिशय अभ्यासपूर्वक प्रेक्षकांसमोर आणतात. या मालिकेसाठी माउलींच्या रचना, ओव्या संगीतबद्ध केल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना एक सुरेल अनुभवही मिळणार आहे. ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडी वेद वदवले, भिंत चालववली आणि चांगदेव महाराजांच्या गर्वहरण प्रसंगात साक्षात वाघावर बसलेले चांगदेव हे प्रसंग खास ग्राफिक्सच्या स्पेशल इफेक्ट्समधून दाखवण्यात आले आहेत. नुकतेच 'ज्ञानेश्वर माउली' या मालिकेच्या शीर्षकगी कशा प्रकारे संगीतबद्ध करण्यात आलं याचा एक सुंदर व्हिडिओ शेअर सोनी मराठीने शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. प्रेक्षकांनी देखील याला चांगली पोचपावती दिली आहे.या व्हिडिओमध्ये शीर्षकगीत कशाप्रकारे तयार करण्यात आली त्यासाठी काय कष्ट घेण्यात आले हे सांगण्यात आले. या शीर्षकगीताला मराठीतील प्रसिद्ध गायिका बेला शेंडे तर अवधूत गांधी आळंदीकर यांनी आवाज दिला आहे. तर देवदत्ता मनीषा बाजी यांनी याचे संगीतकार आहेत. तर या सुंदर शीर्षकगीताचे गीतकार दिग्पाल लांजेकर हे आहेत. दीड मीनिटाचे हा टाईटल ट्रॅक मनाला शांती देतो. सुंदर आवाज त्यासोबत मंत्रमुग्ध करणारे संगीत व गीताची शब्दरचना मनाला स्पर्श करून जाते.
  Published by:News18 Trending Desk
  First published: