मुंबई 10 जुलै: सध्या सगळीकडे आषाढी वारीचं वातावरण आहे. पांडुरंगाला पाहण्यासाठी आतुर झालेल्या भक्तांची आज पंढरपुरात मांदियाळी असल्याची पाहायला मिळत आहे. आजच्या आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) निमित्ताने अनेक कलाकार सुद्धा शुभेच्छा देताना दिसत आहेत. सोनी मराठीवरील ‘ज्ञानेश्वर माउली’ मालिकेतील ज्ञानेश्वरांचं पात्र साकारणारा अभिनेता वरुण भागवत (Varun Bhagwat) पांडुरंगाचं आणि गुगल मॅप्स यांचं अनोखं कनेक्शन शेअर करताना दिसला आहे.
वरुण इन्स्टाग्रामवर बराच ऍक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळत. ‘ज्ञानेश्वर माउली’ मालिकेमुळे त्याला घराघरात ज्ञानेश्वरांच्या भूमिकेसाठी ओळखलं जातं. वरुणने आज आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर खास पोस्ट शेअर केली आहे. त्यात विठ्ठलाच्या कापली असणाऱ्या टिळ्याचं आणि रस्ता दाखवणऱ्या गुगल मॅप्सचं आगळंवेगळं नातं मांडलं आहे.
तो असं लिहितो, “कधी पाहिलंय का की पांडुरंगाचा टिळा आणि Google maps च्या app चा symbol हा जवळजवळ सारखा आहे. मी निरीक्षण करत बसलो आणि लक्षात आलं की बरोबर. दोघेही final destination सांगतात. Google map आपल्याला इप्सित स्थळी पोहोचवतो आणि पांडुरंगाचा तो टिळा (नाम) हे दर्शवतो की इथे पोहोचायचय. Google map रस्ता दाखवतो. पांडुरंग मात्र म्हणतो की रस्ता तुम्ही शोधा. तिथपर्यंत पोहोचण्याचं गमक तो सांगतो. प्रत्येकाचे रस्ते भिन्न असतील.
प्रत्येकाच्या रस्त्यात मधे मधे सतत stops लागतील. त्या stops चं नाव असेल कर्म. एका कर्माची रेषा हिरवी तर दुसऱ्याची लाल असेल. हिरवा रंग म्हणजे चांगलं कर्म. लाल म्हणजे कुकर्म. हिरवं कर्म निवडायचं यासाठीची बुध्दी पांडुरंग आपल्याला देतो, ती वापरायचं काम आपलं. नाहीतर लाल रंगाच्या कर्माच्या traffic jam मधे आपण फसतो आणि काही केल्या त्यातून बाहेर पडता येत नाही. Choice आपल्या हातात दिलाय. योग्य निवड करत जात राहायचं."
वरुण या मालिकेत संत ज्ञानेश्वरांचं पात्र अगदी अप्रतिम पद्धतीने साकारताना दिसतो आहे. त्याच्या या कामाचं खूप कौतुक सुद्धा होताना दिसत आहे. सध्या या मालिकेत संतांची मांदियाळी असल्याचं पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
सध्या वारीच्या निमित्ताने पांडुरंगाच्या भक्तीत रंगलेले अनेक क्षण वारी विशेष भागात मालिकेत दिसून येत आहेत. या मालिकेत नुकतीच तितिक्षा तावडे या अभिनेत्रीची एंट्री झाली आहे. तितिक्षा यात संत कान्होपात्रा हे पात्र साकारत आहे.
View this post on Instagram
यामध्ये संत कान्होपात्रा आणि ज्ञानेश्वर यांची अनोखी भेट होताना पुढे दिसणार आहे. आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने सोनी मराठीवर मालिकेचा महाएपिसोड सुद्धा दाखवला जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ashadhi Ekadashi, Marathi entertainment, Tv serial, Wari