मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

खतरनाक! फिल्म नव्हे तर रिअलमध्ये Sonu sood ने केला असा STUNT; VIDEO पाहूनच चक्रावून जाल

खतरनाक! फिल्म नव्हे तर रिअलमध्ये Sonu sood ने केला असा STUNT; VIDEO पाहूनच चक्रावून जाल

ट्रेनिंगशिवाय हा खतरनाक स्टंट करू नये, असं आवाहन सोनू सूदने आपल्या चाहत्यांना केलं आहे.

ट्रेनिंगशिवाय हा खतरनाक स्टंट करू नये, असं आवाहन सोनू सूदने आपल्या चाहत्यांना केलं आहे.

ट्रेनिंगशिवाय हा खतरनाक स्टंट करू नये, असं आवाहन सोनू सूदने आपल्या चाहत्यांना केलं आहे.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 04 सप्टेंबर : अभिनेता सोनू सूद (Sonu sood) आजवर फिल्ममध्ये स्टंट (Sonu sood stunt)  दाखवता दिसला. पण आता त्याने प्रत्यक्षातही खतरनाक स्टंट (Sonu sood stunt video)  केला आहे. जो पाहून प्रत्येक जण थक्क झाला आहे. सोनू सूदने स्वतः हा व्हिडीओ (Sonu sood excercise video)  शेअर केला आहे आणि ट्रेनिंगशिवाय हा स्टंट करू नये (Sonu sood workout video), असं आवाहन आपल्या चाहत्यांना केलं आहे.

कोरोना काळात अनेकांसाठी देवदूत ठरलेला खरा हिरो सोनू सूद फिटनेसबाबतही (Sonu sood fitness video) खूप जागरू आहे. आपल्या सोशल मीडियावरून तो आपल्या वर्कआऊटचे व्हिडीओ शेअर करत असतो. नुकताच त्याने असा एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे (Sonu sood funny video)

सोनू सूदने सॉलिड स्टंट करून दाखवला आहे. जो पाहिल्यानंतर सुरुवातीला धक्काच बसतो.

हे वाचा - अरे! हे काय? पाण्यात उडी मारताच पूर्ण वेगळे झाले डोक्यावरचे केस; मजेशीर VIDEO

व्हिडीओत पाहू शकता सोनू हँडस्टँड करताना दिसतो आहे. खाली डोकं वर पाय, हातात हँडस्टँट, भिंतीला टेकून त्यानंतर हळूच कमरेतून वाकणं असं काय काय तो करताना दिसतो. व्हिडीओ पाहूनच धडकी भरते. सोनूने हे नेमकं केलं तरी कसं असा प्रश्न पडतो. हा व्हिडीओ शेअर करतान सोनूने कॅप्शन दिलं आहे, हा स्टंट खूप खतरनाक आहे, कृपया ट्रेनिंगशिवाय करू नका.

पण सोनूने दाखवला हा फक्त ट्रेलर आहे. पिक्चर अभी बाकी आहे. खरा पिक्चर व्हिडीओच्या शेवटी आहे, जे पाहून तर तुम्हाला आणखीनच धक्का बसेल. सोनू सूद जेव्हा नीट उभा राहतो आणि त्याच्या शेजारी बसलेली व्यक्ती खुर्चीवरून बाजूला होते, तेव्हा खरं पिक्चर समोर येतं. ही सर्व कॅमेऱ्याची कमाल आहे हे स्पष्ट होतं आणि मग हसू आवरत नाही.

हे वाचा - मोठ्या तोऱ्यात स्टंट करायला गेली आणि...; GF ने BF ची काय अवस्था केली पाहा VIDEO

हा व्हिडीओ सुरुवातीला जितका शॉकिंग आहे तितकाच शेवटी फनी आहे. त्यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.

First published:

Tags: Funny video, Sonu Sood, Viral, Viral videos