• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • ‘महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान आहे’; सोनू सूदनं जिंकलं मराठी माणसाचं मन

‘महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान आहे’; सोनू सूदनं जिंकलं मराठी माणसाचं मन

इतकी मदत करुनही काही मंडळी प्रांतवादाचा मुद्दा उकरुन त्याच्यावर टीका करत होते. परंतु या टीकाकारांना आता सोनूनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

 • Share this:
  मुंबई 18 मार्च: बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (sonu sood) सध्या प्रचंड चर्चेत आहे. कोरोना विषाणूमुळं (coronavirus) निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीत त्यानं शेकडो लोकांना मदत केली. अनेक मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवलं. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. मात्र इतकी मदत करुनही काही मंडळी प्रांतवादाचा मुद्दा उकरुन त्याच्यावर टीका करत होते. परंतु या टीकाकारांना आता सोनूनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “महाराष्ट्र ही माझी कर्मभूमी आहे. मी जन्मभूमीपेक्षा कर्मभूमीला अधिक महत्व देतो. मला महाराष्ट्रीय असल्याचा अभिमान आहे” असं तो म्हणाला. लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सोनूनं आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी त्यानं महाराष्ट्राची तोंड भरुन स्तुती केली. “मी गेली 25 वर्ष महाराष्ट्रात राहतोय. या राज्यानं मला प्रसिद्धी, पैसा, मान सन्मान बरंच काही दिलं. ही माझी जन्मभूमी नसली तरी कर्मभूमी आहे. अन् या कर्मभूमीचा मला अभिमान आहे. मी जन्मभूमीपेक्षा अधिक महत्व माझ्या कर्मभूमीला देतो. कारण या भूमीमुळंच आज मला माझी ओळख मिळाली.” अवश्य पाहा - ‘माझ्याही घरावर ईडीनं धाड टाकावी’; मराठी दिग्दर्शक झाला रातोरात श्रीमंत या मुलाखतीत त्यानं आपल्या मुंबईतील स्ट्रगल बाबतही काही अनुभव सांगितला. “मुंबई ही स्वप्नांची नगरी आहे. सुपरस्टार होण्याचं स्वप्न उराशी बाळगून मी इथे आलो होतो. अर्थात मी सुपरस्टार नाही झालो पण प्रसिद्ध मात्र नक्कीच झालो. मुंबईच्या लोकल ट्रेननं मी फिरायचो. चर्चगेट ते बोरिवली दरम्यान येणारं प्रत्येक स्टेशन मला ठावूक आहे. कारण या प्रवासातच माझ्या करिअरची खरी सुरुवात झाली होती.” अवश्य पाहा - ‘त्यानं मला फसवलं तर...’; कियारा पडली आलिया भट्टच्या एक्स बॉयफ्रेंडच्या प्रेमात सोनू सूदने लॉकडाउनच्या काळात विविध ठिकाणी अडकलेल्या देशभरातील शेकडो मजुरांना आणि विद्यार्थ्यांना बस आणि ट्रेनच्या माध्यमातून त्यांच्या गावी पोहोचवलं आहे. शिवाय त्यांच्या रोजगारासाठीही तो प्रयत्न करत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे ही सोय तो विनामुल्य देत आहे. “शेवटचा मजूर आपल्या घरी पोहोचेपर्यंत मी शांत बसणार नाही.” असं त्याने अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं. आनंदाची बाब म्हणजे या वाक्याचे तो तंतोतंत पालन त्यानं केलं. यापूर्वी सोनुने 1500 PPE किट्सची मदत केली होती. तसेच आपले हॉटेल करोनाग्रस्तांच्या उपचारासाठी खुले करुन दिलं होतं.
  Published by:Mandar Gurav
  First published: