मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

‘त्या मुलीला कोणीतरी आधार द्या’; सोनू सूद मागतोय देशवासीयांकडे मदत

‘त्या मुलीला कोणीतरी आधार द्या’; सोनू सूद मागतोय देशवासीयांकडे मदत

इतरांना मदत करणार सून आज स्वत: मागतोय मदत; अभिनेत्याचा मेसेज पाहून तुम्ही देखील व्हाल भावूक

इतरांना मदत करणार सून आज स्वत: मागतोय मदत; अभिनेत्याचा मेसेज पाहून तुम्ही देखील व्हाल भावूक

इतरांना मदत करणार सून आज स्वत: मागतोय मदत; अभिनेत्याचा मेसेज पाहून तुम्ही देखील व्हाल भावूक

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 6 जून: कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. (Corona Pandemic) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी सरकारनं पुन्हा एकदा लॉकडाउनचा पर्याय स्विकारला. परंतु यामुळं लोकांचं आयुष्य आणखीनच विस्कळीत झालं. लोक बेरोजगार झाले. अगदी काही जणांकडे तर रुग्णालयातील थकित बील भरण्यासाठी देखील पैसे नाहीत अशी अवस्था झाली आहे. या प्रतिकूल परिस्थितीत अभिनेता सोनू सूदनं मदतीचा हात पुढे केला. (sonu sood) शक्य तितक्या लोकांना तो आर्थिक आणि मानसिक आधार देण्याचा प्रयत्न करतोय. पण एका मुलीला मात्र मदत करणं त्याला शक्य होत नाहीये. यासाठी त्यानं देशभरातील इतर लोकांची मदत मागितली आहे.

“सकाळी उठल्या उठल्या मी एक बातमी पाहिली. एका लहान मुलीच्या आई-वडील आणि भावाचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. इतक्या लहान वयात ती मुलगी अनाथ झाली आहे. त्या मुलीला मदत करण्यासाठी कोणीतरी पुढे या. तिला तुमच्या आधाराची गरज आहे. शक्य नसल्यास मला कळवा, मी तिला मदत करेनच.” अशा आशयाचं ट्विट करुन सोनूनं मदत मागितली आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

सोनूला भेटली भारतातील सर्वात श्रीमंत महिला, तिच्या मदतीने झाला भावुक

राखी सावंतनंतर हुमा कुरेशीने व्यक्त केली सोनू सूदला पंतप्रधान करण्याची इच्छा, वाचा नेमकं काय म्हणाली

देशात गेल्या वर्षी कोरोना साथीमुळं देशभर लॉकडाउन (lockdown) लागू करण्यात आला होता. त्यावेळी पायी किंवा मिळेल त्या वाहनानं आपल्या घरी निघालेल्या लाखो-हजारो मजूरांच्या मदतीसाठी बॉलिवूड अभिनेता सोनू सूद पुढं सरसावला होता. हजारो मजुरांना घरी पोहोचवण्यासाठी त्यानं बसेसची सोय केली. त्यांना अन्नधान्यासह आर्थिक मदतही त्यानं केली. त्याचं हे मदतकार्य तेवढ्यापुरतं मर्यादित राहिलं नाही. त्यानं बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी एक अॅप तयार केलं. लोकांच्या मदतीसाठी एक कायमस्वरूपी यंत्रणा त्यानं निर्माण केली. आजही त्याचं मदतकार्य सुरू आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही तो मदतकार्यात आघाडीवर होता. ऑक्सिजनसाठी वणवण फिरणाऱ्या लोकांना मदत करण्याकरता त्यानं चीनकडे (China)मदत मागितली. आता फ्रान्समधून (France) त्यानं ऑक्सिजननिर्मिती प्लँटस (Oxygen Plants) मागवले असून लवकरच ते भारतात दाखल होतील. लोक त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या मदतीची अपेक्षा करत असतात. त्याला शक्य होईल ती मदत तो करतो. कोरोना विषाणू संसर्गाच्या या महाभयंकर संकटात नि:स्वार्थपणे लोकांची सेवा करणाऱ्या सोनू सूदचं देशभर कौतुक होत आहे.बॉलिवूडमधील कलाकारदेखील त्याच्या कामाची प्रशंसा करत आहेत.

First published:

Tags: Corona patient, Corona vaccination, Sonu Sood