सोनू सूदची मुलाकडून एकमेव इच्छा, अभिनय सोडून करावं 'या' क्षेत्रात करिअर

सोनू सूदची मुलाकडून एकमेव इच्छा, अभिनय सोडून करावं 'या' क्षेत्रात करिअर

सलमान खानच्या 'दबंग' सिनेमात छेदी लालची भूमिका साकारणाऱ्या सोनू सूदला क्रिकेटर बनायचं होतं. मात्र, त्याच्या नशीबात काही वेगळंच लिहिलं होतं.

  • Share this:

मुंबई, 21 एप्रिल : अभिनेत्याचा मुलागा हा अभिनेता बनतो. हा बॉलिवूडमधला नियम आहे आणि त्याचा प्रत्यय आपल्याला नेहमीच येत असतो. पण बॉलिवूडमध्ये असा एक अभिनेता आहे. ज्याला आपल्या मुलानं अभिनेता बनावं किंवा बॉलिवूडमध्ये करिअर करावं असं अजिबात वाटत नाही. या अभिनेत्याचं नाव आहे, सोनू सूद. सलमान खानच्या 'दबंग' सिनेमात छेदी लालची भूमिका साकारणाऱ्या सोनूला क्रिकेटर बनायचं होतं. मात्र, त्याच्या नशीबात काही वेगळच लिहिलं होतं. त्यामुळे सोनूला आता आपल्या मुलानं क्रिकेटर बनावं असं वाटतं आणि यासाठी तो आपले पूर्ण प्रयत्न करत आहे.


सोनूचा मुलगा अयानला क्रिकेट खूप आवडतं. त्यामुळे त्याला क्रिकेट शिकवण्यासाठी सोनूनं क्रिकेट प्रशिक्षक दिवेश उपाध्याय यांची नेमणूक केली आहे. ज्यामुळे अयानला आतापासूनच क्रिकेटमधील बारकावे शिकता येतील आणि तो चांगला क्रिकेटर बनू शकेल. आपल्या शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातूनही सोनू आपल्या मुलाच्या प्रशिक्षणावर स्वतः लक्ष देतो. सोनू स्वतः क्रिकेटचा खूप मोठा चाहता आहे. तो अनेकदा मुलांसोबत क्रिकेट केळताना दिसतो. काही दिवसांपूर्वी सोनू मुलगा अयानसोबत चंदीगढ़मध्ये आयपीएल मॅच पाहताना दिसला होता.


मुलाच्या क्रिकेटर बनण्याविषयी सोनू म्हणाला, 'मला नेहमी वाटतं की कोणत्याही गोष्टी योग्य प्रशिक्षण घेणं खूप गरजेचं आहे. दिवेश उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली अयान रोज 4 तास क्रिकेटची प्रॅक्टिस करतो. तो त्यात चांगली प्रगती करत आहे. आयनमध्ये एक विशेष गुण आहे तो म्हणजे त्याला प्रत्येक खेळाडू आणि त्यांच्या रेकॉर्डबाबत सर्व माहिती आहे.' सोनू पुढे म्हणाला, मला वाटतं की, अयाननं खूप मेहनत घ्यावी आणि क्रिकेटर बनण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण करावं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 21, 2019 12:14 PM IST

ताज्या बातम्या