Home /News /entertainment /

बॉलिवूडपासून टॉलिवूडपर्यंत हे कलाकार ठरले 2020 चे REAL HERO

बॉलिवूडपासून टॉलिवूडपर्यंत हे कलाकार ठरले 2020 चे REAL HERO

लॉकडाऊन आणि कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या सामान्य लोकांना अनेक सेलिब्रिटींनी मदत केली. आपलं स्टारडम बाजूला ठेवत गरजू व्यक्तींच्या गरजा समजून घेतल्या आणि त्यांना मदत केली. त्यामुळे ते रिअल लाइफ हिरो ठरले आहेत.

मुंबई, 17 डिसेंबर: कोरोनाच्या (COVID19) या संकटकाळात भारतातील सर्वच नागरिकांना संकटांचा सामना करावा लागला आहे. लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर अनेकजण आहेत त्या ठिकाणी अडकले होते. यामध्ये सर्वात मोठा फटका बसला तो भारतातील अनेक राज्यांमध्ये अडकलेल्या मजुरांना. कोरोनाच्या या संकटकाळात अनेकांनी या मजुरांना मदत करण्याचे प्रयत्न केले. यामध्ये अनेक सामाजिक कार्यकर्त्यांबरोबरच बॉलिवूडमधील अभिनेत्यांनी देखील मोठी मदत केली होती. कोरोनाच्या या कठीण प्रसंगात या अभिनेत्यांनी देखील आपापल्या परीने सर्वसामान्य नागरिक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना मदत केली होती. यामध्ये सोनू सूद (Sonu Sood), अक्षय कुमार (Akshay Kumar), सलमान खान (Salman Khan), प्रभास (Prabhas), हृतिक रोशन (Hrithik Roshan) यांसारख्या नामांकित कलाकारांचा समावेश आहे. 1)सोनू सूद कोरोनाच्या या संकटकाळात गरजुंना मदत करण्यासाठी सर्वात प्रथम सोनू सूद (Sonu Sood) पुढे आला होता. लॉकडाउनच्या काळात पायी आपल्या घरी जाणाऱ्या मजूर बांधवांसाठी सोनू सूदने मोठे कार्य केले. विविध भागांमध्ये अडकलेल्या नागरिकांनादेखील आपल्या घरी जाण्यासाठी त्याने मदत केली. यासाठी त्याने पदरमोड करत शेकडो बस आणि रेल्वेच्या माध्यमातून या नागरिकांना घरी पोहोचवण्याचे काम केले. याचबरोबर त्याने एक हेल्पलाईन क्रमांक सुरु करून त्यामार्फत मजुरांची राहण्याची, खाण्याची आणि उपचारांची देखील व्यवस्था केली. ट्विटवरदेखील त्याने विविध गरजूंशी संपर्क साधून त्यांना मदत केली. जुहूमधील आपले हॉटेल देखील त्याने गरजूंसाठी उघडे करून दिले होते. 2) हृतिक रोशन  (Hrithik Roshan) कोरोनाच्या या संकटकाळात त्याने मुंबई महापालिकेच्या आरोग्य कर्मचारी आणि पोलीस बांधवांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी विविध उपयोगी वस्तू दान केल्या. सोशल मीडियावर देखील तो यासंबंधी सतत जनजागृती करण्याचे काम करत होता. कोरोनाच्या संकटात आर्थिक संकटात अडकलेल्या 100 हून अधिक डान्सरना त्याने आर्थिक मदत देऊ केली. त्याचबरोबर CINTAA या चित्रपट कलावंतांच्या संघटनेलादेखील त्याने मोठ्या प्रमाणात मदत केली. याचबरोबर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान मदत निधीमध्येदेखील त्याने मोठी रक्कम दान केली होती. 3)अक्षय कुमार अक्षय कुमार (Akshay Kumar) हा नेहमीच सामाजिक कार्यात आणि मदत करण्यात पुढे असतो. कोरोनाच्या या काळातदेखील त्याने अनेकांना मदत केली. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री मदत निधी मध्ये देखील त्याने मदत केली. त्याचबरोबर मुंबई पोलीस, मुंबई महापालिका आणि CINTAA या चित्रपट कलावंतांच्या संघटनेलाला देखील मदत केली. त्याचबरोबर कोरोना संकटकाळात निधी गोळा करण्यासाठी बॉलिवूडमधील कार्यक्रमात देखील त्याने आपला सहभाग नोंदविला होता. 4)सलमान खान सलमान खान (Salman Khan) हा त्याच्या बीइंग ह्युमन(Being human) या फाउंडेशनमार्फत अनेकांना मदत करत होता. त्याचप्रमाणे त्याने कोरोनाच्या काळातदेखील मोठी आर्थिक मदत केली. बॉलिवूडमधील अनेक स्पॉटबॉय आणि बॅकस्टेजला काम करणाऱ्या व्यक्तींना देखील मोठी मदत केली. आपल्या फाउंडेशनमार्फत त्याने बीइंग हंग्री हे फूड ट्रक देखील तयार केल्या होत्या. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजच्या (FWICE ) 25,000 बॅकस्टेज कर्मचाऱ्यांना देखील त्याने आर्थिक मदत केली. शहरी भागातील आणि ग्रामीण भागातील अनेक गरजू नागरिकांना त्याने अन्नधान्य आणि जीवनोपयोगी वस्तू देखील दान केल्या. 5)प्रभास प्रभासने(prabhas) पंतप्रधान मदत निधीमध्ये (PM CARE FUND) 3 कोटी रुपये दान केले. त्याचबरोबर आंध्र प्रदेश आणि तेलंगणा मुख्यमंत्री मदत निधीमध्ये (CM CARE FUND) देखील 50 लाख रुपयांची मदत केली. याचबरोबर तेलुगू सिनेमामधील बॅकस्टेज कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या  क्राइसिस चॅरिटीमध्ये(CCC) देखील 50 लाख रुपयांची मदत केली. याचबरोबर प्रभासने तेलंगणामध्ये इको पार्कसाठी 2 कोटी रुपये दान करण्याबरोबरच 1650 एकर वनभूमी दत्तक घेऊन त्याला आपले दिवंगत वडील उप्पलपति सूर्य नारायण राजू यांचे नाव दिले.
Published by:Amruta Abhyankar
First published:

Tags: Akshay Kumar, Salman khan, Sonu Sood

पुढील बातम्या