Home /News /entertainment /

बापरे! एका दिवसात इतके लोक; सोनूकडे मदत मागणाऱ्यांचा आकडा पाहून तुम्हीही चक्रवाल

बापरे! एका दिवसात इतके लोक; सोनूकडे मदत मागणाऱ्यांचा आकडा पाहून तुम्हीही चक्रवाल

अभिनेता सोनू सूदने (sonu sood) पहिल्यांदाच आपल्याकडे मदत मागणाऱ्या गरजूंचा आकडा शेअर केला आहे.

    मुंबई, 20 ऑगस्ट : कोरोना लॉकडाऊनमध्ये स्थलांतरीत मजुरांना मदत करून बॉलिवूडमध्ये खलनायक अभिनेता सोनू सूद (sonu sood) रिअल लाइफमध्ये हिरो ठरला. त्यानंतर सोशल मीडियावर सोनू सूदकडे अनेकांनी मदत मागितल्याचं आपण पाहिलं आहे आणि त्यांना सोनूने मदतही केली. कधी विचार केला आहे का? सोनूकडे अशा किती लोकांनी मदत मागितली असेल. सोनू सूदने पहिल्यांदाच आपल्याकडे मदत मागणाऱ्या गरजूंचा आकडा सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा आकडा पाहून तुम्हीही चक्रवाल. सोनू सूदकडे दररोज हजारो लोक मदत मागत असतात. ई-मेल, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटवर सोनूच्या प्रत्येक सोशल मीडियाचा मेसेज बॉक्स मदतीच्या मागण्यांनी भरलेला आहे. सोनू सूदने ट्वीट केलं आहे की, "कित्येक लोक वेगवेगळ्या माध्यमातून माझ्याकडे मदत मागतात. 1137 ई-मेल, 19000 फेसबुक मेसेज, 4812 इन्स्टाग्राम मेसेज, 6741 ट्विटर मेसेज, आज  इतके हेल्प मेसेज आले आहेत" दररोज सरासरी मला इतकेच मदतीचे मेसेज येत असतात.प्रत्येकापर्यंत पोहोचणं मला शक्य नाही. मात्र मी माझं बेस्ट देण्याचा प्रयत्न नक्की करेन. कुणाचा मेसेज माझ्याकडून मिस झाला असेल तर मी तुमची माफी मागतो", असंही सोनू म्हणाला. हे वाचा - पुरात भिजली पुस्तकं, अश्रूंचा फुटला बांध; VIDEO पाहून विद्यार्थिनीचे डोळे पुसायला आला सोनू सूद कोरोना काळात सोनू सूद गरजूंसाठी देवदूत ठरला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन लागू झाला आणि मग स्थलांतरित मजूर आपापल्या गावी परतण्यासाठी धडपडू लागले. वाहतूक बंद असल्याने त्यांनी पायीच आपल्या घरचा रस्ता धरला. त्यावेळी सोनू सूद त्यांच्यासाठी धावून आला आणि या मजुरांना गाडीने त्यांच्या घरी पोहोचवण्याची सोय गेली. महाराष्ट्रातील विविध मजुरांना त्यांच्या राज्यामध्ये सुखरूप पोहोचवल्यानंतर प्रवासी मजुरांना नवीन काम मिळावे याकरता सोनूने रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. हे वाचा - प्रत्येक डॉक्टरने एक रुग्ण दत्तक घेतल्यास देशाचं चित्र बदलेल, सोनू सूदला विश्वास कोरोनाच्या परिस्थितीही आपला जीव धोक्यात घालून देशसेवा करणाऱ्या आपली ड्युटी बजावणाऱ्या मुंबई पोलिसांनाही सोनू सुदने मदत केली. मुंबई पोलिसांना त्याने 25000 फेस शिल्ड दिले. फक्त कोरोना आणि कोरोना लॉकडाऊनमुळे उद्बवणाऱ्या समस्यांचा सामना करणाऱ्यांना नव्हे तर सोनू आणि त्याच्या टीमने निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित कुटुंबालाही मदत केली. शिवाय आताही काही राज्यांमध्ये पूरग्रस्तांसाठी त्याने मदतीचा हात दिला आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Sonu Sood

    पुढील बातम्या