Home /News /entertainment /

चाहत्याच्या सिम कार्डवर सोनू सूदचा फोटो; अभिनेत्याने दिली मजेशीर प्रतिक्रिया

चाहत्याच्या सिम कार्डवर सोनू सूदचा फोटो; अभिनेत्याने दिली मजेशीर प्रतिक्रिया

सोनू सूदचा (sonu sood) फोटो असलेलं हे सिम कार्ड सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

    मुंबई, 08 सप्टेंबर : कोरोनाच्या या संकटकाळात बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (sonu sood) याने गरिबांना मदत करत खऱ्या अर्थाने आपण हिरो असल्याचं दाखवून दिलं. त्याने अनेक नागरिकांना कोरोनाच्या काळात सर्वच व्यवस्था ठप्प असताना घरी पोहोचवण्याचं काम केलं. त्याने आणि त्याच्या टीमने केवळ लोकांना घरी न पोहोचवता गरजूंना मदतदेखील केली. त्यामुळे सोशल मीडियावर त्याच्या अनेक चाहत्यांनी तसंच लोकांनी त्याचं कौतुक करत त्याचे आभार देखील मानले आहेत. अजूनही लोकं त्याची स्तुती आणि कौतुक करताना दिसून येत आहेत. अशाचप्रकारे सध्या त्याच्या ट्विटरवरील एका चाहत्याने एका जुन्या सिम कार्डवर त्याचा फोटो पेंट केला आहे. याने हा फोटो सोशल मीडियावर टाकल्यानंतर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहत्याने फोटो ट्विटरवर पोस्ट करत लिहिलं की, सोनू सर, मी तुमचा फोटो सिम कार्डवर पेंट केला आहे. तुम्हाला कसा वाटला ?तुम्ही खूप उत्तम काम करत आहात. सोनू सूदने हा फोटो पाहताच त्यावर  "10G network" अशी कमेंट केली. दरम्यान, सोनू सूद याने कोरोनाच्या काळात नागरिकांना त्यांच्या घरी जाण्यास मदतच केली नाही तर अनेक ठिकाणी मदत देखील केली. आंध्र प्रदेश मधील एका ग्रामीण आदिवासी भागात त्याने रस्ते बांधून मदत केली. विजयनगरम जिल्ह्यातील कोदामा बारी गावात त्याने चार किलोमीटरचा रस्ता तयार करून ग्रामस्थांची मोठी अडचण दूर केली. वर्षानुवर्षे प्रशासनाला विनंती करून देखील त्यांनी हे रस्ते तयार न करून दिल्यानंतर अखेर सोनू सूद त्यांच्या मदतीला धावून आला. हे वाचा - "हो मी ड्रग्ज घ्यायचे", अभिनेत्री कंगना रणौतचा VIDEO VIRAL त्याचबरोबर आतादेखील तो सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक गरजू व्यक्तींना मदत करताना दिसून येत आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी सरकारला काही करता आले नाही त्या ठिकाणी देखील सोनू सूदने मदत केल्यामुळे सर्व देशभरातून त्याचे कौतुक करण्यात आले. तसेच नागरिकांबरोबरच त्याने पोलिसांना देखील मोठ्या प्रमाणात कोरोना पासून बचाव करण्यासाठी सुरक्षा साधनांची मदत केली.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Sonu Sood

    पुढील बातम्या