मुंबई, 13 जुलै : अभिनेता सोनू सूदने कोरोना विषाणूमुळे लागू केलेल्या टाळेबंदीमुळे मृत आणि जखमी झालेल्या 400 पेक्षा जास्त प्रवासी मजुरांच्या कुटुंबीयांना आर्थिक पाठबळ देण्याचा संकल्प केला आहे. दबंग चित्रपटाच्या या अभिनेत्याने उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडसह विविध राज्यांतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि लॉकडाऊनमध्ये प्राण गमावलेल्या स्थलांतरित मजुरांचा पत्ता आणि बँक तपशील घेतला.
सूद यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, "मी मृत किंवा जखमी झालेल्या स्थलांतरित कुटुंबाच्या सुरक्षित भवितव्यासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना मदत करणे ही माझी वैयक्तिक जबाबदारी आहे असे मला वाटते." सूद हजारो परप्रांतीयांना त्यांच्या मूळ राज्यात नेण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था करीत आहे. गेल्या महिन्यात, अभिनेत्याने 300 पेक्षा जास्त स्थलांतरित कामगारांना स्वत:च्या राज्यात पाठविण्यास मदत करण्यासाठी चार्टर्ड प्लेनची व्यवस्था केली होती.
हे वाचा-35 वर्षीय कोरोना योद्धा महिलेचा मृत्यू; त्यागाला मुख्यमंत्र्यांनी केला सलाम
सध्या सोशल मीडियावर सोनू सूद चर्चेत आहे. कोणी त्याचे आभार मानत आहे, तर कोणी त्याच्यासाठी प्रार्थना करीत आहे. कोणी त्याला वास्तविक जीवनाचा नायक म्हणत आहे. सोनूही सोशल मीडियावर प्रत्येकाला प्रत्युत्तर देत आहे. दरम्यान, सोनू सूद आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन वापरकर्त्याच्या पोस्टवर नियमित प्रतिक्रिया देतो.
लॉकडाऊनमध्ये सोनू सूदची स्थलांतरित कामगारांना मोठी मदत मिळाली. लॉकडाऊनमध्ये सर्व सेवा बंद असल्याने आपल्या घरी जाण्यासाठी कामगारांनी रस्तेमार्ग स्वीकारला होता. यामध्ये अनेक अपघातात कित्येक जणांचा जीव गेला. यामुळे सोनू सूदने कामगारांसाठी बस सेवा उपलब्ध करुन दिली होती. त्यानंतर आता मृत वा जखमी झालेल्या कामगारांच्या मदतीसाठी त्याने कंबर कसली आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.