रिअल हिरो सोनू सूद आहे कोट्यावधींच्या संपत्तीचा मालक, जगतो रॉयल लाइफस्टाइल

रिअल हिरो सोनू सूद आहे कोट्यावधींच्या संपत्तीचा मालक, जगतो रॉयल लाइफस्टाइल

तुम्हाला माहित आहे की सर्वांच्या मदतीसाठी झटणाऱ्या या रिअल हिरोची संपत्ती किती आहे.

  • Share this:

मुंबई, 31 मे : सध्या बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या नावाचीच चर्चा सगळीकडे दिसून येत आहे. मुंबईमध्ये अडकलेल्या अनेक प्रवासी मजूरांसाठी सध्या सोनू रिअल हिरो ठरला आहे. सोशल मीडिया, मोबाईल हेल्पलाइन नंबर अशा सर्वच माध्यमांतून सोनू सूद सध्या सर्वांना मदत करताना दिसत आहे. त्यामुळे आता सोनू सूद विषयी बऱ्याच गोष्टी जाणून घेण्याची लोकांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे. पण तुम्हाला माहित आहे की सर्वांच्या मदतीसाठी झटणाऱ्या रिअल हिरोची संपत्ती किती आहे.

हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड, पंजाबी अशा विविध भाषांतील सिनेमांमध्ये काम करणारा सोनू सूद सध्या एक यशस्वी अभिनेता आहे. 2009 मध्ये ‘अरुंधती’ या तेलुगू सिनेमात खलनायकाची भूमिका साकारल्यानंतर त्याच्या करिअरला एक वेगळंच वळण मिळालं. या सिनेमात खऱ्या अर्थाने त्याच्या अभिनयाचा कस लागला आणि त्यानंतर साऊथ आणि बॉलिवूड सिनेमांमध्ये त्याला दमदार भूमिका मिळू लागल्या. मात्र गेल्या काही दिवसांपासून तो त्याच्या चित्रपटांमुळे नाही तर त्याच्या मदतकार्यामुळे तुफान चर्चेत आहे.

सोनू सूदकडे लोक काय मागतील याचा नेम नाही! या गोड चिमुरडीचा VIDEO पाहाच

 

View this post on Instagram

 

घर चलें❣️@goel.neeti

A post shared by Sonu Sood (@sonu_sood) on

सध्या सर्वांचा रिअल हिरो ठरत असलेल्या सोनूला मोठ्या पडद्यावर खलनायक साकारण्यासाठी मात्र बरीच मोठी रक्कम मानधन म्हणून मिळते. ‘रिपब्लिक वर्ल्ड’ने दिलेल्या वृत्तानुसार, सोनू सूदची एकूण संपत्ती 130.339 कोटी रुपये इतकी आहे. सोनू सूद खूप रॉय लाइफ जगतो मात्र सध्या तो सर्व काही विसरून केवळ लोकांच्या मदत कार्यात गुंतला आहे. त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टवरूनच त्याच्या रॉयल लाइफस्टाइल अंदाज येतो.

'दंगल' फेम अभिनेत्रीला Lockdown मध्ये गंभीर दुखापत, करावी लागली सर्जरी

या अभिनेत्याला आता इंडस्ट्रीमध्ये जवळपास 21 वर्ष पूर्ण झाली आहेत. सोनू सूदनं करिअरच्या सुरुवातील लोकल ट्रेनमधूनही प्रवास केला. ज्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 23 वर्षांपूर्वीचा हा फोटो आहे जेव्हा सोनू त्याचं अभिनेता होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईमध्ये आला होता. त्यावेळी लोकल ट्रेनचा प्रवास करण्यासाठी त्यानं काढलेल्या ट्रेनच्या पासचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो 1997 च्या पासचा आहे जेव्हा सोनू 24 वर्षांचा होता.

 

View this post on Instagram

 

Dear Mind, Stop Thinking......

A post shared by Sonu Sood (@sonu_sood) on

लॉकडाऊनमध्ये सोनू सूद लोकांना खूप मदत करत आहे. त्याच्या या कामाचं कौतुक केवळ बॉलिवूड सेलेब्स आणि सामान्य लोकांनीच नाही तर अनेक राजकीय व्यक्तींनी सुद्धा केलं आहे. याशिवाय नुकतंच राज्यपालांनी सुद्धा सोनूला भेटीला बोलवत त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. सोनू सूदनं 1999 मध्ये एका टॉलिवूड सिनेमातून त्याच्या अभिनयाला सुरुवात केली होती. 2001 मध्ये त्यानं शहिद ए आजम मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आतापर्यांत सोनूनं अनेक सिनेमात खलनायकाची भूमिका साकारली आहे मात्र खऱ्या आयुष्यात मात्र सध्या तो सर्वांचा हिरो ठरला आहे.

अजय देवगणमुळे आजही अविवाहित आहे तब्बू; म्हणाली, मी त्याच्यावर खूप...

First published: May 31, 2020, 3:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading