मुंबई, 25 एप्रिल : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (Corona in India) सर्वसामान्य लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालयात जागा मिळत नसून उपचाराअभावी अनेकांचा मृत्यू होत आहे. ज्यांची मोठ्या ठिकाणी ओळख-पाळख आहे, अशांनाच सध्या बेड, व्हेंटिलेटर मिळत आहेत, असे चित्र आहे. या परिस्थितीत पुन्हा एकदा अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) लोकांच्या मदतीला धावून आला आहे. गेल्या वर्षीही कोरोनामुळे ज्यावेळी अचानक टाळेबंदीची घोषणा झाली. त्यादरम्यान परप्रांतीय मजूरांना मोठा त्रास सहन करावा लागला, त्यावेळीही सोनू सूद त्यांच्या मदतीला आला होता.
सोनू सूदने शनिवारी एक टेलिग्राम (Sonu Sood Telegram app) अॅप लॉन्च केलं आहे. ज्याद्वारे तो देशभरातील गरजू लोकांना रुग्णालयात बेड, औषधं आणि ऑक्सिजन मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. शनिवारी त्यांने ट्विट करून देशवासियांना सोनू सूद कोविड फोर्समध्ये सामील होण्याचं आवाहन केले. त्याने लिहिलं आहे की, 'आता संपूर्ण देश एकत्र येईल. माझ्यासोबत टेलिग्राम चॅनेलवर जॉईन व्हा आणि 'इंडिया फाइट्स विथ कोविड' मोहिमेत हातात-हात देवून काम करूया.. देशाला वाचवायचे आहे.'
अब पूरा देश साथ आएगा।
जुड़िए मेरे साथ Telegram चैनल पे “India Fights With Covid “ पर हाथ से हाथ मिलाएँगे .. देश को बचाएँगेhttps://t.co/Qa5nxskuqk pic.twitter.com/UPzNuufYjA — sonu sood (@SonuSood) April 24, 2021
या भीषण काळात सोनू सूद दररोज लोकांना मदत करत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने नागपुरातील (Nagpur Corona Update) एका कोरोनाबाधित मुलीसाठी एअर रुग्णवाहिकेची व्यवस्था केली होती. या मुलीच्या फुफ्फुसांवर 85 ते 90 टक्के विषाणूचा परिणाम झाला होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर सोनू सूदने या मुलीला नागपूरहून हैदराबाद येथे विमानाने आणले आणि त्यानंतर तिला अपोलो रुग्णालयात दाखल केले गेले. यापूर्वीही सोनू सूदने देशातील प्रत्येक गरजूंना अँटी-कोरोना लसी लागू करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. यासाठी त्याने देशवासियांना त्याच्या मोहिमेत सामील होण्याचे आवाहन केले होते.
हे वाचा - COVID-19: दुसऱ्या लाटेत झोपट्टीपेक्षा मध्यमवर्गीयांमध्ये कोरोनाचा प्रसार अधिक, कारण आलं समोर
काही दिवसांपूर्वी सोनूने ट्विट करत (Sonu Sood tweeted) चाहत्यांच्या मनातील देशभक्ती जागी करण्याचा प्रयत्न केला. त्याने ट्विटमध्ये लिहिलं आहे. ‘15 ऑगस्टला देशभक्ती दाखवणाऱ्यांसाठी संदेश ... देशासाठी काही करण्याची आणि देशभक्ती दाखवण्याची याहून चांगली संधी कधीच येणार नाही’. यासोबतच तिरंगा आणि हात जोडण्याचे इमोजी त्याने शेअर केले. फक्त एक दिवस देशभक्ती (patriotism) दाखवून काहीच होणार नाही. तर आता खरी देशभक्ती दाखवायची वेळ आली असल्याचं तो या ट्विटमधून म्हणाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.