सोनू सूदकडे लोक काय मागतील याचा नेम नाही! या गोड चिमुरडीचा VIDEO पाहाच

सोनू सूदकडे लोक काय मागतील याचा नेम नाही! या गोड चिमुरडीचा VIDEO पाहाच

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. सध्या अशी वेळ आली आहे की त्याच्याकडे लोक काय मागतील याचा काही नेम नाही.

  • Share this:

मुंबई, 31 मे : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. मागच्या काही दिवसांपासून सोनू सूद मुंबईमध्ये अडकलेल्या देशाच्या विविध भागातील प्रवासी मजूरांना त्यांच्या घरी सोडण्याचं काम करत आहे. अगदी सोशल मीडियावरून मदत मागणाऱ्यांनाही सोनूनं निराश केलेलं नाही. याशिवाय त्यांनं काही दिवसांपूर्वी एक हेल्पलाइन नंबर सुद्धा सुरू केला आहे. मात्र त्याच्याकडे या सर्वांत जास्त मदत मागितली गेली ती ट्विटरवरून. पण सध्या अशी वेळ आली आहे की सोनू सूदकडे लोक काय मागतील याचा काही नेम नाही. आताही असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यात एका चिमुकलीनं त्याच्याकडे अशी मदत मागितली आहे जे ऐकल्यावर सोनू स्वतः हैराण झाला आहे.

सोनू सूदनं त्याच्या ट्विटरवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात एका लहान मुलगी सोनूकडे मदत मागताना दिसत आहे. या व्हिडीओमधली मुलगी सोनूला सांगते, 'सोनू अंकल मी ऐकलं आहे की, तुम्ही सर्वांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मदत करत आहात. माझे बाबा विचारत होते तुम्ही माझ्या आईला माझ्या आजीच्या घरी सोडू शकता का?' सोनूनं या चिमुकलीचा व्हिडीओ रिट्वीट करत त्यावर कमेंट केली. हे खरंच आव्हानात्मक आहे मात्र मी माझे प्रयत्न करेन.

तापसी पन्नूवर कोसळला दुःखाचा डोंगर, खास व्यक्तीनं घेतला जगाचा निरोप

सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ खूप व्हायरल होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी असंच एका व्यक्तीनं सोनूकडे गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी मदत मागितली होती. तर आणखी एकानं दारुच्या दुकानापर्यंत पोहोचवण्याची मागणी केली होती. विशेष म्हणजे सोनू सूद एवढा बीझी असतानाही अशा प्रकारच्या ट्वीटला सुद्धा आवर्जुन रिप्लाय देत आहे. मात्र लोक त्याच्याकडे आणखी काय काय मागतील याचा नेम राहिलेला नाही.

लॉकडाऊनमध्ये सोनू सूद लोकांना खूप मदत करत आहे. त्याच्या या कामाचं कौतुक केवळ बॉलिवूड सेलेब्स आणि सामान्य लोकांनीच नाही तर अनेक राजकीय व्यक्तींनी सुद्धा केलं आहे. याशिवाय नुकतंच राज्यपालांनी सुद्धा सोनूला भेटीला बोलवत त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. सोनू सूदनं 1999 मध्ये एका टॉलिवूड सिनेमातून त्याच्या अभिनयाला सुरुवात केली होती. 2001 मध्ये त्यानं शहिद ए आजम मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आतापर्यांत सोनूनं अनेक सिनेमात खलनायकाची भूमिका साकारली आहे मात्र खऱ्या आयुष्यात मात्र सध्या तो सर्वांचा हिरो ठरला आहे.

लॉकडाऊनमध्ये बिग बींसोबत घडलं असं काही, जे याआधी 78 वर्षांत कधीच झालं नाही

आज अनेकांसाठी देवदूत; मात्र एकेकाळी सोनू सूदनेही सहन केलेत ट्रेनचे धक्के

First published: May 31, 2020, 10:47 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading