आधी रोजगार आता डोक्यावर छत; सोनू सूदकडून हजारो प्रवासी मजुरांसाठी हक्काचं घर

आधी रोजगार आता डोक्यावर छत; सोनू सूदकडून हजारो प्रवासी मजुरांसाठी हक्काचं घर

आपल्या पोर्टलच्या माध्यमातून सोनू सूदने (sonu sood) तब्बल 20 हजार प्रवासी मजुरांना घर ऑफर केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 24 ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) गेल्या काही महिन्यांपासून अनेकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. कोरोना लॉकडाऊनमध्ये प्रवासी मजुरांना त्यांच्या राज्यात पोहोचवलं. त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आणि आता याच प्रवासी मजुरांसाठी अभिनेता सोनू सूद छत देणार आहे. प्रवासी मजुरांना त्यांचं हक्काचं घर देणार आहे. सोनू सूदने 20 हजार मजुरांसठी नोएडामध्ये घर ऑफर केलं आहे.

सोनू सूदने प्रवासी मजुरांना घर देणार असल्याची माहिती आपल्या ट्विटरवर दिली आहे. सोनूने ट्वीट केलं आहे, "20 हजार प्रवासी मजुरांना मी आता घर ऑफर करत आहे. प्रवासी रोजगारच्या माध्यमातून ज्या मजुरांना नोएडामध्ये काम मिळालं आहे, त्यांना मी घर देऊ इच्छित आहे. नॅशनल असोसिएशन फॉर एलिव्हेशन कॉन्ट्रॅक्टरचे अध्यक्ष ललित ठकुराल यांच्या मदतीने मला हे साध्य करता येत आहे."

कोरोना काळात सोनू सूद गरजूंसाठी देवदूत ठरला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन लागू झाला आणि मग स्थलांतरित मजूर आपापल्या गावी परतण्यासाठी धडपडू लागले. वाहतूक बंद असल्याने त्यांनी पायीच आपल्या घरचा रस्ता धरला. त्यावेळी सोनू सूद त्यांच्यासाठी धावून आला आणि या मजुरांना गाडीने त्यांच्या घरी पोहोचवण्याची सोय गेली.

हे वाचा - सोनू सूदने केली मदत, आता पुण्याची वॉरिअर आजी देतेय स्वसंरक्षणाचे धडे; पाहा VIDEO

महाराष्ट्रातील विविध मजुरांना त्यांच्या राज्यामध्ये सुखरूप पोहोचवल्यानंतर प्रवासी मजुरांना नवीन काम मिळावे याकरता सोनूने रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. सोनू सूदने आपल्या 47 व्या वाढदिवशी प्रवासी मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं होतं. यासाठी त्याने प्रवासी रोजगार नावाचं एक अॅपही लाँच केलं होतं. ज्या मजुरांना प्रवासी रोजगाराच्या माध्यमातून नोएडामध्ये काम मिळालं आहे, त्यांच्यासाठी हे घर असल्याचं सोनूने सांगितलं आहे.

कोरोना लॉकडाऊनमध्ये स्थलांतरीत मजुरांना मदत करून बॉलिवूडमध्ये खलनायक अभिनेता सोनू सूद (sonu sood) रिअल लाइफमध्ये हिरो ठरला. त्यानंतर सोशल मीडियावर सोनू सूदकडे अनेकांनी मदत मागितल्याचं आपण पाहिलं आहे आणि त्यांना सोनूने मदतही केली. कधी विचार केला आहे का? सोनूकडे अशा किती लोकांनी मदत मागितली असेल.  सोनू सूदने काही दिवसांपूर्वी पहिल्यांदाच आपल्याकडे मदत मागणाऱ्या गरजूंचा आकडा सोशल मीडियावर शेअर केला होता.

हे वाचा - ज्या कोरोना लॉकडाऊनला कंटाळले लोक त्याचा यामी गौतमला झाला फायदा; शेअर केला अनुभव

सोनू सूदकडे दररोज हजारो लोक मदत मागत असतात. ई-मेल, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटवर सोनूच्या प्रत्येक सोशल मीडियाचा मेसेज बॉक्स मदतीच्या मागण्यांनी भरलेला आहे. सोनूला दररोज 1137 ई-मेल, 19000 फेसबुक मेसेज, 4812 इन्स्टाग्राम मेसेज, 6741 ट्विटर मेसेज मदतीसाठी येतात. सोनू शक्य तितक्या लोकांना मदत करण्याचं प्रयत्न करतो.

Published by: Priya Lad
First published: August 24, 2020, 3:16 PM IST

ताज्या बातम्या