मुंबई, 02 जानेवारी : कौन बनेगा करोडपतीच्या 12 व्या सीजनमध्ये नुकतच सोनू सूदने I’m no Messiah हे पुस्तक लाँच केलं आहे. सोनू सूदबरोबर कर्मवीर पद्मश्री करीमुल हक आणि प्रशांत गाडे यांच्यासोबत हॉटसीटवर होते. यावेळी त्यांना 25 लाखासाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही आणि त्यांना खेळ सोडावा लागला आहे. 25 लाखांसाठी जो प्रश्न विचारण्यात आला होता त्यावर सोनू सूद आणि स्पर्धक दोघांनाही पर्याय वाचल्यानंतर ठाम उत्तर देता येत नव्हतं. त्यामुळे त्यांनी लाईफलाइन निवडायचं ठरवलं. 25 लाखांच्या प्रश्नावर सोनू सूदने दिलेलं उत्तर चुकलं आहे.
काय होता प्रश्न?
बिग बी अमिताभ बच्चन यांनी 25 लाखांसाठी सोनू सूद आणि स्पर्धकाला एक प्रश्न विचारला होता. भारत सरकार आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील व्यक्ती व संस्थांचा सन्मान करण्यासाठी कोणत्या स्वातंत्र्यसेनानीच्या नावे हा पुरस्कार दिला जातो? प्रश्नासाठी उत्तराचे पर्याय पुढील प्रमाणे होते. 1- नेताजी सुभाषचंद्र बोस 2- महत्मा गांधी 3- सरदार वल्लभ भाई पटेल 4. बाळ गंगाधर टिळक
या प्रश्नाचं उत्तर देताना सोनू सूद आणि स्पर्धक थोडे कन्फूज झाले आणि त्यांना लाईफलाइन निवडण्याचा पर्याय स्वीकारला. त्यांनी लाइफलाइन निवडल्यानंतर सरदार वल्लभ भाई पटेल हे उत्तर दिलं. त्यावर अमिताभ यांनी हे उत्तर चुकीचं असल्याचं सांगितलं. या प्रश्नाचं योग्य उत्तर नेताजी सुभाषचंद्र बोस होतं. पण सोनू सूद यांनी जर या प्रश्नाचं उत्तरच दिलं नसतं तर ते 25 लाख रुपये हरले असते.
हे वाचा-नववर्षाच्या पार्श्वभूमीवर लता दीदींनी केलं पंतप्रधान मोदींच्या कामाचं कौतुक
त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी 25 लाख रुपयांसाठी नवा प्रश्न विचारला जो तंत्रज्ञानावर आधारित होता. 1994 रोजी कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीला संगणक शास्त्रज्ञ विजेता म्हणून पुरस्कार मिळाला होता? उत्तरासाठी पर्याय होते- 1. राज रेड्डी 2. नरेंद्र करमरकर 3. अनिल कुमार जैन 4. इंद्रजित मणी हे पर्याय होते. या उत्तराबद्दल सोनू सूद अगदी स्पष्ट दिसत होता आणि त्याचप्रमाणे स्पर्धक, व्यवसायाने अभियंता होता. त्यांनी राज रेड्डी हा पर्याय निवडला आणि 25 लाख रुपये जिंकले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.