पुरात भिजली पुस्तकं, अश्रूंचा फुटला बांध; VIDEO पाहून विद्यार्थिनीचे डोळे पुसायला आला सोनू सूद

पुरात भिजली पुस्तकं, अश्रूंचा फुटला बांध; VIDEO पाहून विद्यार्थिनीचे डोळे पुसायला आला सोनू सूद

छत्तीसगडमधील (chhattisgarh) एका पूरग्रस्त विद्यार्थिनीसाठी सोनू सूद (sonu sood) धावून आला आहे.

  • Share this:

विजापूर, 19 ऑगस्ट : कोरोना लॉकडाऊनमध्ये अभिनेता सोनू सूदने (sonu sood) अनेकांची मदत केली आहे. फक्त लॉकडाऊनमुळेच नाही तर नैसर्गिक आपत्तीचा सामना करणाऱ्यांसाठी सोनू सूदने पुढाकार घेतला आहे. सोशल मीडियावरील व्हिडीओ, बातम्या पाहूनही त्याने गरजूंना मदत केली. छत्तीसगडमधील (chhattisgarh) अशाच एका पूरग्रस्त विद्यार्थीनीसाठी सोनू सूद धावून आला आहे.

छत्तीसगडच्या कोमला गावात राहणारी आदिवासी मुलगी अंजली कुडियम. 15 आणि 16  ऑगस्टला तिच्या घरात पुराचं पाणी घुसलं. पुरात आपला जीव वाचवण्यासाठी अंजली आपलं कुटुंब आणि इतर ग्रामस्थांसह मध्यरात्री साडेतीन वाजता आपलं घर सोडून आपल्या गावापासून 5 किलोमीटर दूर धाकडपारामध्ये गेली.

पुराचं पाणी ओसरल्यानंतर ती पुन्हा आपल्या घरी परतली तेव्हा घराची अवस्था पाहून तिला धक्काच बसला. घर पूर्णपणे पडलं होतं, सामान इकडेतिकडे पसरलं होतं. अशी परिस्थिती पाहून अंजलीला सर्वात आधी लक्षात आली ती आपली पुस्तकं. एका टोपलीत ठेवलेली पुस्तकं तिनं काढली. ती पूर्णपणे पाण्यात भिजली होती. अशी पुस्तकं पाहून तिच्या अश्रूंचा बांध फुटला. तिला रडू आवरत नव्हतं, ती ढसाढसा रडू लागली.

हे वाचा - प्रत्येक डॉक्टरने एक रुग्ण दत्तक घेतल्यास देशाचं चित्र बदलेल, सोनू सूदला विश्वास

न्यूज 18 च्या कॅमेऱ्यात ही दृश्य कैद झाली आणि रिपोर्टरने आपल्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला. रिट्वीट होत हा व्हिडीओ सोनू सूदपर्यंत पोहोचला. सोनू सूदने हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तिला अश्रू पुसण्याची विनंती केली आणि मदतीचं आश्वासन दिलं.

"बहिणी डोळे पुस. पुस्तकंही नवीन असतील आणि घरही नवीन असेल", असं ट्वीट सोनू सूदने केलं आहे. व्हिडीओ शेअर झाल्यानंतर काही तासांतच सोनू सूदच्या टीमचा हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या न्यूज 18 च्या रिपोर्टरला फोन आला आणि त्यांनी अंजलीबाबत अधिक माहिती मागून घेतली.

हे वाचा - कुणी काढला सेल्फी; कुणाचा नवरा झाला फोटोग्राफर; कोरोना काळात Fashion Photography

अंजली भैरमगढच्या सरकारी शाळेतून बारावी पास झाली आहे. आता ती स्पर्धा परीक्षेची तयारी करते आहे. तिला भाऊदेखील शाळेत शिकतो आहे. वडील शेतकरी आहेत. पाच एकर शेतीवर संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. आता पुरामुळे हे शेतही उद्ध्वस्त झालं आहे आणि अंजलीला आपली स्वप्नं पाण्यात वाहून गेलेली दिसली. मात्र सोनू सूदने तिच्या स्वप्नांना असं कोलमडू देणार नसल्याचं आश्वस्त केलं आहे.

Published by: Priya Lad
First published: August 19, 2020, 8:34 PM IST

ताज्या बातम्या