सोनू निगमनं केला अजानचा व्हिडिओ ट्विट

सोनू निगमनं केला अजानचा व्हिडिओ ट्विट

सकाळी साडे पाच वाजताचा हा व्हिडिओ आहे.सोनूच्या इमारती शेजारच्या मशिदीवरून अजान दिली जात होती. त्याचा हा व्हिडिओ आहे.

  • Share this:

23 एप्रिल : धार्मिक स्थळांवरच्या लाऊडस्पीकर सोनू निगमच्या विधानावरून नुकताच वाद झाला. त्यावर आज सोनूनं ट्विटरवर आज एक व्हिडिओ अपलोड केला. सकाळी साडे पाच वाजताचा हा व्हिडिओ आहे.सोनूच्या इमारती शेजारच्या मशिदीवरून अजान दिली जात होती. त्याचा हा व्हिडिओ आहे.

माझा विरोध मशीद, अजान किंवा इस्लामला नाही. सर्वच धार्मिक स्थळांवरच्या लाऊडस्पीकरला माझा विरोध आहे. असं स्पष्टीकरण सोनूनं दिलं होतं. आपला नेमका कशाला विरोध आहे, हे दाखवण्यासाठी सोनूनं हा व्हिडिओ पोस्ट केला असावा.

लेखक-गीतकार जावेद अख्तर यांनी सोनूला पाठिंबा दिलाय. धर्माला कुणाचाच विरोध नाही. पण कुणाची झोप मोडू नये किंवा डिस्टर्ब होऊ नये, एवढाच सोनूचा अर्थ होता, असं जावेद साहेब म्हणाले.

First published: April 23, 2017, 2:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading