मशिदीवरच्या भोंग्याबद्दल सोनू निगमचा नाराजीचा सूर

मशिदीवरच्या भोंग्याबद्दल सोनू निगमचा नाराजीचा सूर

मी मुस्लिम नाही आणि तरीही अजानच्या कर्कश आवाजानं झोपेतून का उठावं असा सवाल केलाय तो प्रसिद्ध गायक सोनू निगमनं.

  • Share this:

17 एप्रिल : मी मुस्लिम नाही आणि तरीही अजानच्या कर्कश आवाजानं झोपेतून का उठावं असा सवाल केलाय तो प्रसिद्ध गायक सोनू निगमनं. त्यानं मशिदीवरच्या भोंग्यांना अप्रत्यक्षपणे विरोध केलाय. तसं त्यानं ट्विट केलंय.

काय म्हटलंय सोनूनं?

देव तुमचं भलं करो.

मी मुस्लीम नाही आणि तरीही, रोज सकाळी मी अजाननं का उठावं? देशातलं हे जबरदस्तीचं धार्मिकपण का सहन करावं? जेव्हा मोहम्मदनं इस्लाम निर्माण केला तेव्हा वीज नव्हती.  त्यामुळे हा कर्कशपणा का? मंदिरं, गुरूद्वाऱ्यांनीही असं धार्मिक नसलेल्या लोकांना उठवणं चुकीचं आहे.

एवढंच नाही तर देशातलं हे लादलेलं धार्मिकपण बंद कधी होणार असा सवालही सोनूनं केलाय. सोनू निगमनं फक्त मशिदीवरच्या भोंग्यावरच आक्षेप घेतलाय असं नाही तर मंदिरं, गुरूद्वाऱ्यांनीही लोकांना असं जबरदस्तीनं झोपेतून उठवण्याला विरोध केलाय.

 

First published: April 17, 2017, 12:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading