पाकचं राष्ट्रगीत सुरू असलं तर मी उभा राहीन-सोनू निगम

पाकचं राष्ट्रगीत सुरू असलं तर मी उभा राहीन-सोनू निगम

चित्रपटगृहात राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभं राहण्यावरुन वाद सुरू आहे. या वादात आता गायक सोनू निगमने उडी घेतलीये.

  • Share this:

27 आॅक्टोबर : चित्रपटगृहात राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभं राहण्यावरुन वाद सुरू आहे. या वादात आता गायक सोनू निगमने उडी घेतलीये.

सोनू निगम म्हणाला की, 'मी आपल्या राष्ट्रगीताचा सन्मान करतो पण चित्रपटगृहात आणि रेस्टॉरंटमध्ये राष्ट्रगीत चालवणे योग्य नाही. 'आपल्याला सगळ्या देशांच्या राष्ट्रगीताचा मान ठेवला पाहिजे. आपण सर्वांनी आपल्या राष्ट्रगिताचा आदर करायला पाहिजे.' 'जेव्हा पाकिस्तानचं राष्ट्रगीत चालू होतं. तेव्हा सगळे पाकिस्तानी आदराने उभे राहतात, तर तेव्हा मीसुद्धा पाकिस्तान आणि तिथल्या लोकांच्या आदरासाठी उभा राहीन.' असंही सोनू म्हणाला.

काही लोकं म्हणतात की, चित्रपटगृहात राष्ट्रगीत असलं पाहिजे तर काहींच्या म्हणण्यानुसार तो राष्ट्रगीताचा अपमान असू शकतो. पण यावर सोनू निगमचं म्हणणं आहे की, काही ठिकाणं आपल्या राष्ट्रगीतासाठी योग्य नाहीत. अश्या ठिकाणी राष्ट्रगीत नाही म्हटलं पाहिजे.

सोनू निगमच्या अजान आणि लाउडस्पीकर्च्या ट्विटमुळे आधीचं त्याचे चाहते नाराज आहेत. त्यात सोनूच्या या प्रतिक्रियेवर त्याचे चाहते काय उत्तर देतात हे बघण महत्वाचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 27, 2017 10:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading