मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /लग्नसमारंभात अरेरावी करणाऱ्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांवर सोनू निगम संतापला; VIDEO शेअर करून विचारला सवाल

लग्नसमारंभात अरेरावी करणाऱ्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांवर सोनू निगम संतापला; VIDEO शेअर करून विचारला सवाल

नुकताच सोनूने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला असून, त्यात त्यानं लग्नसमारंभात जाऊन आरडाओरडा करणाऱ्या पश्चिम त्रिपुराच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.

नुकताच सोनूने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला असून, त्यात त्यानं लग्नसमारंभात जाऊन आरडाओरडा करणाऱ्या पश्चिम त्रिपुराच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.

नुकताच सोनूने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला असून, त्यात त्यानं लग्नसमारंभात जाऊन आरडाओरडा करणाऱ्या पश्चिम त्रिपुराच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.

    मुंबई, 29 एप्रिल : आपल्या मधुर आवाजानं लाखो लोकांच्या मनावर राज्य करणारा गायक सोनू निगम (Sonu Nigam) सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतो. आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टींबद्दल तो नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून परखड मत व्यक्त करत असतो. नुकताच त्यानं इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला असून, त्यात त्यानं लग्नसमारंभात जाऊन आरडाओरडा करणाऱ्या पश्चिम त्रिपुराच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.

    इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, पश्चिम त्रिपुरातील (West Tripura) दंडाधिकारी (District Magistrate) शैलेश कुमार यादव (Sailesh Kumar Yadav) यांनी संचारबंदीच्या (Curfew) काळात लग्नसमारंभ (Marriage Ceremony) नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ सुरू असल्याबद्दल वधूवर आणि नातेवाईकांवर अर्वाच्य भाषेत आरडाओरडा केला. त्याचा व्हिडिओ सोनू निगम याच्या पाहण्यात आला. हा व्हिडिओ पाहून अत्यंत नाराज झालेल्या सोनू निगम यानं यादव यांच्या वर्तनाबद्दल जाब विचारणारा एक व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

    हे ही वाचा-सेलिब्रिटींनी दिला मदतीचा हात; कोरोना रुग्णांसाठी केलं Plasma Donation

    ‘जिल्हा दंडाधिकारी शैलेशकुमार यादव हे अतिशय दुःखद आहे,’अशी कॅप्शन त्यानं या व्हिडिओला दिली आहे. ‘एका लग्नसमारंभात जाऊन जिल्हा दंडाधिकारी शैलेशकुमार यादव यांनी ज्या पद्धतीनं वधूवर आणि इतरांवर आरडओरडा केला ते पाहून अत्यंत वाईट वाटत असल्याचं सोनू निगमनं या व्हिडिओत म्हटलं आहे. लग्नसमारंभात जाऊन अत्यंत तुसडेपणानं अपमानकारक भाषेत लोकांना बोलण्याच्या यादव यांच्या वर्तनाबद्दल आक्षेप घेत, लोकांशी असं बोलण्याची तुमची हिंमतच कशी होते? असा थेट सवाल त्यानं केला आहे. यादव यांच्या अशा वागण्यानं एका कुटुंबाच्या आनंदाला गालबोट लागलं आहे. अगदी खास असणारा हा त्यांचा दिवस यादव यांच्यामुळे खराब झाला आहे, अशी भावना त्यानं व्यक्त केली आहे. त्यांच्याकडून नियमभंग होत असल्याबद्दल त्यांना आदरानं सांगता आलं असतं. अशाप्रकारे अनादर वागणे योग्य नाही अशी खरमरीत टीका त्यानं केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दाखला देत त्यानं आपल्या देशाच्या पंतप्रधानपदी असणारी एवढी मोठी व्यक्तीदेखील कधीही कोणाशी अनादरानं बोलत नाही,याकडे त्यानं लक्ष वेधलं आहे.

    दरम्यान,मंगळवारी शैलेशकुमार यादव यांनी त्रिपुरामधील माणिक्य कोर्ट इथं सुरू असलेल्या लग्नसोहळ्यात जाऊन आरडाओरडा केल्याबद्दल माफी (Apology) मागितली आहे. तिथं जमलेले लोक कलम 144चं उल्लंघन करत होते, त्यामुळे 30 पेक्षा अधिक लोकांना अटक करण्यात आली आणि नंतर सोडून देण्यात आलं. कोणाच्याही भावना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता असं यादव यांनी म्हटलं आहे. रात्रीची संचारबंदी असल्यानं मी त्यांच्यावर नियम मोडत असल्याबद्दल आक्षेप घेतला. कोणाच्याही भावना दुखावण्याचा किंवा कोणाचा अपमान करण्याचा माझा उद्देश नव्हता. लोकांच्या भल्यासाठीच मी हे केलं असंही यादव यांनी आपल्या माफीनाम्यात म्हटलं आहे.

    First published: