• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • ‘खोटी स्तुती करून स्पर्धकांना बिघडवू नका’; सोनू निगमची Indian Idolला विनंती

‘खोटी स्तुती करून स्पर्धकांना बिघडवू नका’; सोनू निगमची Indian Idolला विनंती

स्पर्धकांची इतकी देखील स्तुती करू नका की ते बिघडतील असा सल्ला त्याने शोच्या मेकर्सला दिला आहे.

 • Share this:
  मुंबई 18 जुलै: इंडियन आयडल (Indian Idol 12) हा कधीकाळी छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय संगीत शो म्हणून ओळखला जायचा. देशभरातील एकापेक्षा एक गायक या शोमध्ये भाग घेऊन आपलं नशीब आजमावून पाहात होते. यापैकी अनेकांना प्रसिद्धी, पैसा आणि बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी देखील मिळाली. (indian idol troll) परंतु गेल्या काळात इंडियन आयडलची लोकप्रियता कमालीची ढासळू लागली आहे. या शोमध्ये दाखवल्या जाणाऱ्या ड्रामेबाजीमुळं प्रेक्षक संतापले आहेत. अन् यावर आता प्रसिद्ध गायक सोनू निगम (Sonu Nigam) याने देखील टोलेबाजी केली आहे. स्पर्धकांची इतकी देखील स्तुती करू नका की ते बिघडतील असा सल्ला त्याने शोच्या मेकर्सला दिला आहे. ‘…त्यावेळी उपचारासाठी नव्हते पैसे’; नाना पाटेकर वडिलांच्या आठवणीनं झाले भावुक पाहुया नेमकं काय म्हणाला सोनू निगम? सोनू निगमने ई टाइम्सला मुलाखतीमध्ये सांगितले की, “सर्वसाधारणपणे आपल्याकडे परीक्षक हे स्पर्धकांना काही तरी शिकवण्यासाठी असतात. परीक्षकांनी स्पर्धकांना प्रामाणिकपणे त्यांचे मत सांगणे अपेक्षित असते. सतत स्पर्धकांचे कौतुक करण्यात काहीच अर्थ नसतो. परीक्षकांनी सतत स्पर्धकांचे वा वा म्हणत कौतुक करून कसे चालेल? असे करणे म्हणजे मुलांना बिघडवण्यासारखेच नाही का. परीक्षकांना मुलांना बिघडवायचे नाही तर घडवायचे आहे. परीक्षक सतत स्पर्धकांचे कौतुक करत राहिले तर स्पर्धकांना ते कधी चुकले ते कधी कळणारच नाही.” Minissha Lamba दुसऱ्यादा पडली प्रेमात; पतीला घटस्फोट दिल्यानंतर बिझनेसमॅनला करतेय डेट यापूर्वी देखील सोनू निगमने इंडियन आयडलवर टीका केली होती. या शोमध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रामेबाजी केली जाते. स्पर्धकांची गाणी सोडून नकोत्या गोष्टींवर फोकस केला जातो. परिक्षकांनी ड्रामेबाजी थोडीशी थांबवावी अन् प्रेक्षकांना निखळ स्पर्धा दाखवावी अशी विनंती त्याने शोच्या मेकर्सला केली होती.
  Published by:Mandar Gurav
  First published: