... आणि पाकिस्तानी कुस्तीपटूला सोनू सूदने हरवलं

सोनू सूद 'द ग्रेट खली' याच्या रेस्लिंग अकॅडमीमध्ये गेला होता. त्यात तो रिंगच्या आतमध्ये उभं राहून सगळ्यांशी गप्पा मारत होता. तर झालं असं की सोनू सगळ्यांशी बोलत असताना आरडाओरड करत तिथे एक व्यक्ती आला. तो स्वत:ला पाकिस्तानी म्हणवून घेत होता. त्याच्यासोबत एक महिला पाकिस्तानचा झेंडा घेऊन आली होती. या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तो व्यक्ती सोनूला कुस्तीसाठी आव्हान देत होता.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Nov 28, 2017 06:46 PM IST

... आणि पाकिस्तानी कुस्तीपटूला सोनू सूदने हरवलं

28 नोव्हेंबर: बॉलिवूड अभिनेता सोनू सूद फक्त पडद्यावरच नाहीतर खऱ्या आयुष्यातही तितकाच फिट आहे.  त्याचाच एक प्रत्यय दरम्यान पार पडलेल्या रेस्लिंग रिंगच्या एका कार्यक्रमात पहायला मिळाला.  अचानक उगवलेल्या एका पाकिस्तानी  पैलवानाला सोनूने रेस्लिंगमध्ये एका  हरवलं  आणि या अजब  फाईटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सोनू सूद 'द ग्रेट खली' याच्या रेस्लिंग अकॅडमीमध्ये गेला होता. त्यात तो रिंगच्या आतमध्ये उभं राहून सगळ्यांशी गप्पा मारत होता. तर झालं असं की सोनू सगळ्यांशी बोलत असताना आरडाओरड करत तिथे एक व्यक्ती आला. तो स्वत:ला पाकिस्तानी म्हणवून घेत होता. त्याच्यासोबत एक महिला पाकिस्तानचा झेंडा घेऊन आली होती. या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तो व्यक्ती सोनूला कुस्तीसाठी आव्हान देत होता.

आता सोनूही काही गप्प बसण्याऱ्यांमधला नाही आहे. त्याने  त्याचं आव्हान स्विकारलं आणि त्याला स्टेजवर बोलावलं. आता यापुढची त्यांची कुस्ती खूपचं मजेदार झाली. सोनूने त्या पाकिस्तानी व्यक्तीची जोरदार धुलाई केली. आणि त्याला बाद केलं. तो मार खाता खाता खाली पडतो आणि तितक्यात गाणं वाजायला सुरुवात झाली. त्या पाकिस्तानी व्यक्तिबरोबर आलेल्या महिलेने या गाण्यावर सोनूसोबत डान्स केला. सोनूचा हा दमदार व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 28, 2017 06:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...