Home /News /entertainment /

'रिया चक्रवर्ती बिचारी निर्दोष आहे' आलियाची आई आली समर्थनार्थ धावून

'रिया चक्रवर्ती बिचारी निर्दोष आहे' आलियाची आई आली समर्थनार्थ धावून

गेल्या काही दिवसांपासून रिया चक्रवर्तीवर (Rhea Chakraborty) चहूबाजूंनी टीका होत आहे. आता बॉलीवूडमधील (Bollywood) काही कलाकार मंडळी (Celebrities) उघडपणे तिचं समर्थन (Support) करत आहेत.

    मुंबई, 18 जानेवारी: सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूनंतर (Sushant singh rajput death case) बॉलीवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) चुकीच्या कारणांसाठी चर्चेत आहे. रियावर सुशांतला ड्रग्जच्या आहारी उतरवण्यापासून त्याची संपत्ती हडपण्यापर्यंत अनेक आरोप झाले आहेत. ड्रग्ज प्रकरणात रियाला काही काळ तुरुंगातही घालवावा लागला आहे. अशा परिस्थितीत रिया चक्रवर्तीवर चहूबाजूंनी टीका होत असताना, बॉलीवूडमधील काही कलाकार उघडपणे तिचं समर्थन करत आहेत. यामध्ये शिवानी दांडेकर पासून राजीव लक्ष्मण अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे. या दरम्यान आता बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टची आई आणि प्रसिद्ध फिल्ममेकर सोनी राझदान देखील रिया चक्रवर्तीच्या समर्थनार्थ पुढे आली आहे. सोनी राझादानने अलीकडेच रिया चक्रवर्तीला समर्थन करणारं ट्विट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी एका ट्वीटर वापरकर्त्याला रिया चक्रवर्तीला काम न मिळण्याबाबत प्रत्युत्तर दिलं आहे. या ट्वीटर वापरकर्त्याने रिया चक्रवर्ती करिअरबाबत एक ट्विट केलं होतं. ज्यामध्ये तो म्हणाला होता की, 'रिया तुरुंगात जाऊन आल्यानंतर  तिची चित्रपटातील कारकीर्द जवळपास संपुष्टात आली आहे, आता तिला चुकूनच कोणीतरी काम देईल.' या क्वोट करताना सोनी राझदान यांनी ट्विट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिलं की- 'रिया तुरुंगात जाऊन येणं, यावरून हे स्पष्ट होतं की तिला तुरुंगात पाठवणाऱ्यांचं पितळ स्पष्टपणे उघडं पडलं आहे. रिया ही अत्यंत नियोजनपूर्वक पद्धतीने केलेल्या कटकारस्थानाची पीडित आहे. त्यामुळे का कोणी तिच्याबरोबर काम करणार नाही? मला वाटतं ती चांगल्याप्रकारे करू शकेल. अशी आशा मी करते. तथापि, यापूर्वीही सोनी राझदानने रियाला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला होता. तसेच तिचा पती महेश भट्टही रियाच्या समर्थनार्थ उभं असल्याचं दिसून आलं आहे. अर्णब गोस्वामी चाट प्रकरणावरून फराह खानही रियाच्या बाजुने उभी असल्याचं पाहायला मिळालं. फराहने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की,' मला आशा आहे की, रिया चक्रवर्ती अर्णबच्या प्रकरणावरुन शेवटची हसली असेल. ज्या व्यक्तीनं तिला संपवण्याचा प्रयत्न केला, त्याला तर यश मिळालं नाही. पण तोच त्याची प्रतिष्ठा गमावून बसला.'
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bollywood actress, Rhea chakraborty

    पुढील बातम्या