'कलंक'चं पहिलं गाणं प्रदर्शित, 'घर मोरे परदेसीया'नं जिंकली प्रेक्षकांची मनं

'कलंक'चं पहिलं गाणं प्रदर्शित, 'घर मोरे परदेसीया'नं जिंकली प्रेक्षकांची मनं

भव्य सेट आणि अप्रतिम नृत्य असलेल्या या गाण्याच्या प्रदर्शनानंतर प्रेक्षकांमध्ये 'कलंक'विषयीची उत्सुकता वाढली आहे.

  • Share this:

मुंबई, 18 मार्च: अभिनेत्री आलिया भट आणि वरुण धवन यांच्या प्रमुख भूमिका असलेला बहुचर्चित 'कलंक' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला होता. टीझरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. यानंतर सिनेमाच्या कलाकारांवर विशेषतः बॉलिवूडची 'चुलबुली गर्ल' आलियावर कौतुकाचा वर्षाव झाला.  आता या सिनेमातील 'घर मोरे परदेसिया' हे पहिलं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं . हे गाणं आलिया भट्ट आणि माधुरी दीक्षित यांच्यावर चित्रित करण्यात आलं असून याची कोरिओग्राफी प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसोझाने केली आहे.

'घर मोरे परदेसिया' या गाण्यातून माधुरी आणि आलिया यांचं बहारदार नृत्याविष्कार पाहण्याची संधी त्यांच्या चाहत्यांना लाभली आहे. हे गाणं प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल आणि वैशाली माडेने गायलं असून संगीतकार प्रीतम यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. तर अमिताभ भट्टाचार्य यांनी हे गाणं लिहिलं आहे. निर्माता करण जोहरनं या गाण्याच्या प्रदर्शनाची माहिती ट्विटरवरून दिली. या गाण्यातील आलिया आणि माधुरी यांच्या लूकनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

भव्य सेट आणि अप्रतिम नृत्य असलेल्या या गाण्याच्या प्रदर्शनानंतर प्रेक्षकांमध्ये 'कलंक'विषयीची उत्सुकता वाढली असून येत्या 17 एप्रिलला हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अभिषेक वर्मन दिग्दर्शित 'कलंक'मध्ये आलिया भट, वरुण धवन, संजय दत्त, माधुरी दीक्षित आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

First published: March 18, 2019, 3:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading