सोनम कपूर आनंद आहुजासोबत लवकरच विवाहबंधनात!

सोनम कपूर आनंद आहुजासोबत लवकरच विवाहबंधनात!

सोनमचा हा शाही विवाहसोहळा स्वित्झर्लंडमध्ये पार पडणार आहे. जवळच्या मित्र-मंडळींना आमंत्रण देण्याची जबाबदारी खुद्द अनिल कपूर यांच्याकडे असल्याचं देखील बोललं जातंय.

  • Share this:

25 मार्च : अभिनेत्री सोनम कपूर बॉयफ्रेंड आनंद आहुजासोबत लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या गेल्या बऱ्याच दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहेत. 11 आणि 12 मे दरम्यान सोनम-आनंद लग्न करणार असल्याचं आता समोर आलंय.

सोनमचा हा शाही विवाहसोहळा स्वित्झर्लंडमध्ये पार पडणार आहे. जवळच्या मित्र-मंडळींना आमंत्रण देण्याची जबाबदारी खुद्द अनिल कपूर यांच्याकडे असल्याचं देखील बोललं जातंय. आता सोनम-आनंदचा हा शाही विवाहसोहळा नेमका कसा असणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय.

श्रीदेवीच्या मृत्यूनंतर कपूर कुटुंब बराच काळ दु:खात होतं. आता हळूहळू सगळे सावरतायत. आणि सोनम कपूरच्या लग्नाच्या तयारीसाठी सगळेच एकत्र आलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 25, 2018 11:52 AM IST

ताज्या बातम्या