मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /‘तू किती मुर्ख आहे पुन्हा सिद्ध झालं’; लंडनमधील स्वातंत्र्यामुळे सोनम कपूर ट्रोल

‘तू किती मुर्ख आहे पुन्हा सिद्ध झालं’; लंडनमधील स्वातंत्र्यामुळे सोनम कपूर ट्रोल

“देशात घरकामं करणं लज्जास्पद आणि विदेशात केलं तर स्वातंत्र्य?” असा सवाल करत सध्या तिला ट्रोल केलं जात आहे.

“देशात घरकामं करणं लज्जास्पद आणि विदेशात केलं तर स्वातंत्र्य?” असा सवाल करत सध्या तिला ट्रोल केलं जात आहे.

“देशात घरकामं करणं लज्जास्पद आणि विदेशात केलं तर स्वातंत्र्य?” असा सवाल करत सध्या तिला ट्रोल केलं जात आहे.

मुंबई 9 जुलै: अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूर (Sonam Kapoor) आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. अनेकदा यामुळे तिला ट्रोल देखील केलं जातं. असाच काहीसा प्रकार या वेळेसही घडला आहे. सोनम सध्या लंडनमध्ये स्वातंत्र्य उपभोगतेय असं म्हणाली, परंतु याच वक्तव्यामुळे नेटकरी तिच्यावर भडकले आहेत. (Sonam Kapoor Trolled) “देशात घरकामं करणं लज्जास्पद आणि विदेशात केलं तर स्वातंत्र्य?” असा सवाल करत सध्या तिला ट्रोल केलं जात आहे.

नेमकं काय म्हणाली सोनम कपूर?

सोनम कपूर सध्या आपल्या पतीसोबत लंडनमध्ये राहतेय. अलिकडेच एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत लंडनमध्ये मी स्वातंत्र्याचा अनुभव घेतेय असं म्हणाली. “मला इथलं स्वातंत्र्य आवडतं. मी स्वत: स्वयंपाक करते, घराची साफ सफाई करते. बाजारातून किराणा खरेदी करते.” असा अनुभव तिने सांगितला. या विधानामुळे सध्या तिला जोरदार ट्रोल केलं जात आहे.

क्रिती सेनॉन आई होणार? व्हिडीओ पाहून तुम्ही देखील चक्रावून जाल

‘ब्लाऊज घालायला विसरलीस का?’ Bold ड्रेसमुळे शिल्पा शेट्टी होतेय ट्रोल

‘लंडनमधील स्वातंत्र्य’ या वाक्यावरून नेटकऱ्यांनी सोनमवर निशाणा साधला आहे. भारतातदेखील सोनम स्वत: काम करू शकली असती घरकामांसाठी माणसं ठेवण्याची तिच्यावर कुणी जबरदस्ती केली नाही असं म्हणत नेटकऱ्यांनी सोनमचा समाचार घेतलाय. एक युजर म्हणाला, “ती मुर्ख आहे हे तिने पुन्हा एकदा सिद्ध केलं. तिच्या घरात मोकरीण आणि घरकाम करणाऱ्यांनी जबरदस्ती प्रवेश केला होता का?” असा देखील सवाल तिला काही ट्रोलर्सने केला आहे. तर दुसरा युजर म्हणाला, ” भारतात स्वातंत्र्य एन्जॉय करण्यापासून कुणी तुला अडवलं होतं? देशात घरकामं केलं तर लाजीरवाणं आणि विदेशात केलं तर स्वातंत्र्य..व्वा..भारतीय महिलांना सेकेण्ड क्लास नेटिझन्स म्हणणाऱी सोनम कपूर दुट्टपीपणाची पण हद्द असते.”

First published:
top videos

    Tags: Bollywood actress, Social media troll, Sonam Kapoor