Home /News /entertainment /

सोनम कपूरच्या आयुष्यात SOMEONE SPECIAL ची एन्ट्री; म्हणाली,आता प्रतीक्षा नाही होत...

सोनम कपूरच्या आयुष्यात SOMEONE SPECIAL ची एन्ट्री; म्हणाली,आता प्रतीक्षा नाही होत...

अभिनेत्री सोनम कपूरने काही तासांपूर्वी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला एक सुंदर हसरा फोटो शेअर केला आहे. सोबतच त्याला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधलं आ

  मुंबई, 25 सप्टेंबर- बॉलिवूड (Bollywood Actress) अभिनेत्री सोनम कपूर(Sonam Kapoor) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती सोशल मीडियावर आपले लुक्स आणि फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. बॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्यापासून सोनमने अनेकवेळा आपल्या फॅशनने सर्वांना चकित केलं आहे. नुकताच लंडनहून भारतात परतलेली अनिल कपूरची कन्या मोठ्या चर्चेत आहे. नुकताच सोनमने गुड न्यूज देत आपल्या आयुष्यात कोणा खासची एन्ट्री झाल्याचं म्हटलं आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Sonam K Ahuja (@sonamkapoor)

  अभिनेत्री सोनम कपूरने काही तासांपूर्वी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला एक सुंदर हसरा फोटो शेअर केला आहे. सोबतच त्याला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. सोनमने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे, 'कोणतीतरी खूप खास आहे. ज्याने माझ्या आयुष्यात प्रवेश केला आहे. ती जाणीव खूपच खास आहे. मी तुम्हाला त्याचा परिचय करून देण्याची प्रतीक्षा नाही करू शकत. लवकरच त्याला भेटण्यासाठी तयार व्हा'. असं म्हणत सोनमने पोस्ट केली आहे. सोनमची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहते वेगवगेळे अंदाज लावत आहेत. शिवाय संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी सोनम प्रेग्नेंट असल्याचं म्हटलं आहे. (हे वाचा:Shamita Shetty आणि Rakesh Bapat ची डिनर डेट; जोडीचा रोमँटिक व्हिडीओ होतोय VIRAL) काही दिवसांपूर्वी सोनम कपूर लंडनहुन भारतात परतली होती. त्यावेळी एयरपोर्टवर आपले वडील अनिल कपूर यांना पाहून ती अक्षरशः रडायला लागली होती. कारणही तसंच होतं, सोनम लॉकडाऊन दरम्यान पूर्ण वेळ लंडनमध्ये होती. इतक्या दिवसांनी आपल्या वडिलांना पाहून तिला अश्रू अनावर झाले होते. सोनमचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. दरम्यान काही फोटोंवरून सोनम कपूर प्रेग्नेंट असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. मात्र त्यांनतर सोनम कपूरने आपला एक एक्सरसाईजचा टोन्ड बॉडी फोटो शेअर करत या अफवांना पूर्णविराम दिला होता. मात्र सोनमच्या या नव्या पोस्टने सर्वांच्या अपेक्षा पुन्हा वाढवल्या आहेत. सोनमच्या त्या घोषणेची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत. (हे वाचा:Antim: सलमान खानच्या'अंतिम'ची मोठी अपडेट; वाचा चित्रपट कधी होणार Release) नुकताच अभिनेत्री सोनम कपूरची बहीण आणि अनिल कपूरची मुलगी रिया कपूरचा लग्नसोहळा पार पडला. रियाने आपल्या १३ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असलेल्या बॉयफ्रेंड करण बुलानीसोबत लग्न केलं आहे. लॉकडाऊनमुळे हा सोहळा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत अगदी खाजगी पद्धतीने पार पडला. यावेळी सोनम कपूर आणि पती आनंद अहुजा यांचा सुपरक्लासी लूक पाहायला मिळाला होता.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Sonam Kapoor

  पुढील बातम्या