सोनम कपूरने धारण केलेल्या 'या' नव्या अवतारानं उत्सुकता वाढली

सोनम कपूरने धारण केलेल्या 'या' नव्या अवतारानं उत्सुकता वाढली

अशा 'क्रिकेट लक्ष्मी'च्या अवतारात सोनम काय करतेय असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला.

  • Share this:

मुंबई, 22 ऑगस्ट : अभिनेत्री सोनम कपूर आहुजाने Sonam kapoor हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि अशा क्रिकेट लक्ष्मीच्या अवतारात सोनम काय करतेय असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला. निळ्या नऊवारीत नटलेली ही देवी, एका हातात हेल्मेट, एका हातात क्रिकेटची बॅट आणि स्पोर्ट्स शूज अशा अवतारात दिसते आहे. सोनमच्या आगामी सिनेमासाठी हा अवतार तिने धारण केला आहे. द झोया फॅक्टर The zoya factor नावाचा हा सिनेमा येत्या 20 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. त्याचं पहिलं motion poster गुरुवारी प्रसिद्ध झालं. या पोस्टरमध्ये सोनम क्रिकेट देवतेच्या अवतारात दिसते आहे.

द झोया फॅक्टर या सिनेमात सोनमबरबोरच प्रसिद्ध मल्याळी अभिनेता दुलकर सलमान हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सोनमने स्वतःच्या Instagram अकाउंटवरून या सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. भारताची 'लकी चार्म' असं तिने या पोस्टरच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

हे वाचा - अमिताभ बच्चन यांनी सांगितला रोहित शर्माच्या नावाचं अर्थ, वाचून व्हाल हैराण!

भारताची ही लकी चार्म असताना लिंबू-मिरचीची काय आवश्यकता आहे, असंही सोनमनं लिहिलं आहे.

 

View this post on Instagram

 

Who needs Nimbu Mirchi, when you have Zoya Solanki! India’s lucky charm is here to turn tables around for you. #TheZoyaFactor @dqsalmaan #AbhishekSharma @pooja__shetty @aartishetty @foxstarhindi @ad_labsfilms

A post shared by Sonam K Ahuja (@sonamkapoor) on

अभिषेक शर्मा दिग्दर्शित द झोया फॅक्टर हा सिनेमा 20 सप्टेंबरला रीलिज होणार आहे. The Zoya Factor मध्ये सोनमचा काका - म्हणजे अभिनेता संजय कपूर तिच्या वडिलांच्या भूमिकेत आहे. ती एका जाहिरात कंपनीत काम करणाऱ्या अधिकाऱ्याची भूमिका करत आहे. ती भारतीय क्रिकेट टीमची लकी मॅस्कॉट कशी होते, याची ही कथा आहे.

हे वाचा - सनी लिओनी आहे इतक्या कोटींची मालकीण, संपत्ती ऐकूण व्हाल थक्क!

अनुजा चौहान यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित हा सिनेमा आहे. अंगद बेदी यात महत्त्वपूर्ण भूमिका करत आहे.

हेही वाचा - पाकिस्तान सैराट! आता म्हणे प्रियांका चोप्राला सदिच्छा दूत म्हणून काढून टाका कारण

सोनम ही आपल्यासाठी लकी चार्म असल्याचं वडील अनिल कपूर यांनी सांगितलं आहेच. आता ही क्रिकेट लक्ष्मीच्या रूपातली सोनम कुणा-कुणासाठी लकी चार्म ठरणार हे सिनेमा पाहिल्यावरच कळेल. सोनमने इन्स्टाग्रामवरून हे पोस्टर शेअर केल्यानवर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. झोया माता की जय! अशा प्रतिक्रियाही या पोस्टरवर आल्या आहेत.

SPECIAL REPORT : काँग्रेस ते राष्ट्रवादी सर्वांनीच दिली 'राजाला साथ'!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 22, 2019 08:10 PM IST

ताज्या बातम्या