
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर लवकरच आई होणार आहे.

सोनम सोशल मीडियावर बेबी बंप फ्लॉन्ट करत तिच्या आई होण्याची बातमी चाहत्यांनी दिली.

प्रेग्नंट सोनम कपूर तिचं मॅटरनिटी फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करत असते.

बेबी बंप फ्लॉन्ट करत सोनमनं शेअर केलेल्या सगळ्या फोटोंमध्ये तिचा प्रेग्नंसी ग्लो दिसून आला आहे.

मात्र प्रेग्नंसीच्या काळात सोनमला इतर स्त्रियांप्रमाणे काही गोष्टींचा सामना करावा लागतोय.

सोनम कपूरनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिचा एक फोटो शेअर केलाय. ज्यात प्रेग्नंसीमुळे तिचे पाय सुजल्याचं दिसत आहे.

प्रेग्नंसीच्या काळात पायाला सूज येणं यासारख्या समस्यांचा सोनमला देखील सामना कारावा लागत आहे.

'कधी कधी प्रेग्नंसी सुंदर नसते', असं कॅप्शन देत सोनमनं तिच्या सुजलेल्या पायांचे फोटो शेअर केले आहेत.

सोनमचा पाय सुजलेला फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सोनमचा प्रेग्नंसीमधील हा अनुभव अनेक स्त्रियांनी रिलेट केला आहे.

सोनम आणि आनंद अहुजा आई बाबा होणार असल्यानं सध्या कपूर आणि अहुजा कुटुंबात प्रचंड आनंदाच वातावरण आहे.

सोनमला मुलगा होणार की मुलगी हे जाणून घेण्यासाठी सगळेच आतूर आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.