मुंबई, 14 जुलै : बॉलिवूड सेलिब्रिटीवर नेहमीच सुंदर दिसण्याचा दबाव असतो. त्यामुळे अनेक अभिनेत्री मेकअप शिवाय बाहेर जाणं टाळताना दिसतात. बॉलिवूड मधील काही ठराविक अभिनेत्री वगळता अनेक अभिनेत्री त्यांचं वाढतं वय लपवण्यासाठी मेकअपचा आधार घेतात. मात्र नुकताच कपूर खानदानातली प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूरनं तिचा भविष्यातला म्हणजेच म्हातारपणीचा फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
सोनम बॉलिवूडची टॉप फॅशनिस्टा म्हणून ओळखली जाते. त्यामुळे तिचे अनेक चाहते फॅशनसाठी तिला फॉलो करताना दिसतात. इतकच नव्हे तर सोनम नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोनमनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिच्या फॅनपेजवरून शेअर करण्यात आलेला एक फोटो शेअर केला. ज्यात ती 75 वर्षांची म्हातारी दिसत आहे. हा फोटो खरं तर फोटोशॉप्ड केलेला आहे. सोनमनं हा फोटो शेअर करताना एक कॅप्शन दिलं आहे. यात तिनं लिहिलं, ‘पाहा जेव्हा ती 75-80 वर्षांची होईल तेव्हा ती अशी दिसेल. पण तरीही ती सुंदर असेल. खरंच नेहमीच ब्यूटी क्वीन’ फोटो पाहिल्यावर सर्वांना समजेल की म्हातारपणीही सोनम तेवढीच सुंदर दिसेल.
या’ अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर, अमरनाथ यात्रेला जाताना वडीलांचा मृत्यू
सोनम कपूर लवकरच आगामी सिनेमा द जोया फॅक्टरमध्ये दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत दलकीर सलमान प्रमुख भूमिकेत आहे. हा सिनेमा एका कादंबरीवर आधारित आहे. जोया नावाची एक मुलगी क्रिकेट वर्ल्ड कप टीमसाठी लकी चार्म बनते. सोनमनं काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या खाजगी आयुष्याविषयी आणि सिने करिअर विषयी सांगितलं होतं. यावेळी सोनम म्हाणाली, मला आयशा आणि खूबसुरत या दोन्ही सिनेमांच्या वेळी अनेक समस्यांचा सामना करावा लागला. या सिनेमाचं नाव खूबसूरत होतं म्हणून कोणताही अभिनेता या सिनेमात काम करायला तयार नव्हता. त्यानंतर फवाद खानला या सिनेमासाठी कास्ट करण्यात आलं होतं.
सलमान सुद्धा घेणार ‘नच बलिये 9’मध्ये भाग, कोण असेल त्याची जोडीदार
========================================================
VIDEO: मलायका अरोराच्या फिटनेसचं रहस्य काय?