Home /News /entertainment /

धक्कादायक! लंडनमध्ये कॅब ड्रायव्हरच्या वर्तनानं हादरली सोनम कपूर, वाचा नक्की काय घडलं

धक्कादायक! लंडनमध्ये कॅब ड्रायव्हरच्या वर्तनानं हादरली सोनम कपूर, वाचा नक्की काय घडलं

सोनमनं ट्वीट करत तिच्यासोबत घडलेल्या या धक्कादायक घटनेची माहिती दिली.

    मुंबई, 16 जानेवारी : अभिनेत्री सोनम कपूरचा सध्या वाईट काळ सुरू आहे. मागच्या काही दिवसांपासून सोनम कपूर वेगवेगळ्या देशात प्रवास करत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रवासादरम्यान सोनमचं सामान गहाळ झालं होतं. त्यानंतर आता लंडन शहरात प्रवास करत असताना सोनमसोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. ज्यामुळे ती खूपच घाबरली आहे. सोनमनं ट्विटरवरुन दिली माहिती सोनमनं ट्वीट करत तिच्यासोबत घडलेल्या या धक्कादायक घटनेची माहिती दिली. लंडनमध्ये उबर सर्व्हिस घेतल्यानंतरचा तिचा अनुभाव किती भीतीदायक होता हे तिनं यावेळी या ट्वीटमध्ये सांगितलं आहे. तिनं लिहिलं, 'मी लंडनमध्ये प्रवास करत असताना उबर सर्व्हिस वापरली. त्यावेळीचा माझा अनुभव खूप भीतीदायक होता. तुम्ही तुमची काळजी घ्या. जेव्हा शक्य होईल तेव्हा लोकल कॅब किंवा सार्वजनिक वाहन सेवेचा वापर करा. माझ्यासोबत घडलेल्या या घटनेनं मला खूप मोठा धक्का बसला आहे.' ‘कॅज्युअल SEX साठी इच्छुक असशील तर संपर्क कर’, गायिकेनं डिजे डिप्लोला केला मेसेज ...आणि सोनम घाबरली सोनमच्या ट्वीटनंतर त्यावर बऱ्याच कमेंट आल्या आहेत. ज्यात सर्वांनी तिला नेमकं काय घडलं याची विचारणा केली आहे. एका युजरनं लिहिलं, सोनम तुझ्यासोबत नक्की काय घडलं. मी लंडनमध्ये कॅबचा वापर करत असल्यानं मला हे जाणून घेणं खूप आवश्यक आहे. या युजरच्या प्रश्नावर उत्तर देताना सोनमनं लिहिलं, माझा कॅब ड्रायव्हर मानसिकदृष्ट्या स्थीर नव्हता. तो जोरजोरात माझ्यावर ओरडत होता. ज्यामुळे मला खूप भीती वाटत होती. सोनमच्या या ट्वीटवर उबरनं सुद्धा कमेंट केली आहे. त्यांनी सांगितलं की, त्यांचे ग्राहक कोणत्याही समस्येबात उबरकडे सरळ सरळ तक्रार करु शकता. मात्र उबरच्या या कमेंटला सोनम अद्याप उत्तर दिलेलं नाही. मलायका अरोराचं नवं फोटोशूट व्हायरल, HOT अँड BOLD अंदाजावर चाहते फिदा या आधीही आली होती समस्या काही दिवसांपूर्वी सोनमनं ब्रिटीश एअरवेजबाबत एक ट्वीट केलं होतं. यामध्ये तिनं या कंपनीच्या विमानातून प्रवास करत असताना तिचं लगेज हरवल्याचं सांगितलं होतं. यासोबतच पुन्हा कधीच या कंपनीच्या विमानतून प्रवास न करण्याचा निर्णय घेतल्याचंही तिनं तिच्या ट्वीटमध्ये सांगितलं होतं. त्यानंतर झालेल्या प्रकाराबद्दल ब्रिटीश एअरवेजनं सोनमची माफी मागत तिचं सामान लवकरात लवकर परत करण्याचं आश्वासन दिलं होतं. बाजारात अ‍ॅसिड मिळतं का? दीपिकाने असं समोर आणलं धक्कादायक वास्तव
    Published by:Megha Jethe
    First published:

    Tags: Bollywood, Sonam Kapoor

    पुढील बातम्या