सोनम कपूरला व्हिगन होणं नडलं, इन्स्टाग्रामवर स्वतःहून दिली माहिती

सोनम कपूरला व्हिगन होणं नडलं, इन्स्टाग्रामवर स्वतःहून दिली माहिती

सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी तिने आपलं वजन कमी केलं होतं. तिने फक्त वजनच कमी केलं नाही, तर आपल्या फॅशनमध्येही बदल केले.

  • Share this:

मुंबई, 26 ऑगस्ट- बॉलिवूड अभिनेत्र सोनम कपूर गेल्या काही दिवसांपासून तिच्या आगामी सिनेमामुळे बरीच चर्चेत आहे. दरम्यान, तिच्या आरोग्याशी निगडीत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे स्वतः सोनमने सोशल मीडिया अकाउंटवरून तिच्या आरोग्याची माहिती दिली. सोनम कपूरच्या शरीरात आयोडिनचं प्रमाण कमी झालं असून ती त्यावर उपचार घेत आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर तिने याचा खुलासा केला.

स्वतःच्या आरोग्याची माहिती देताना तिने चाहत्यांना याबद्दल जागरुक राहण्यास सांगितले. सोनम किती फिट आहे हे वेगळं सांगायची गरज नाही पण तरीही तिच्या शरीरात आयोडिनची कमतरता असल्याचं समोर येताच तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. सोनम कपूर- आहूजाने इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, 'सर्व शाकाहारी आणि व्हेगन लोकांसाठी एक महत्त्वाची माहिती. तुम्ही ही गोष्ट नेहमीच लक्षात ठेवा की, तुम्ही तेच मीठ खा ज्यात आयोडीन असेल. मला नुकतंच कळलं की माझ्यात आयोडिनची कमतरता आहे. तसेच 'टेबल सॉल्ट' हे आयोडिन मिळवण्याचं सर्वोत्तम साधन आहे.'

बॉलिवूडमधील फिट अभिनेत्री म्हणून सोनमकडे पाहिलं जातं. सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी तिने आपलं वजन कमी केलं होतं. तिने फक्त वजनच कमी केलं नाही, तर आपल्या फॅशनमध्येही बदल केले. स्टाइल दिवा असं वेगळं बिरूद तिला मिळालं आहे. विशेष म्हणजे सोनमने काहीही घातलं तरी तो ट्रेण्ड होतो.

सोनमच्या सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर, लवकरच ती अभिनेता दुलकर सलमानसोबत झोया फॅक्टर या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 20 सप्टेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 2008 मध्ये आलेल्या अनुजा चौहान यांच्या कादंबरीवर हा सिनेमा बेतला आहे. अभिषेक शर्मा दिग्दर्शित या सिनेमात सोनम आणि दुसकर सलमानशिवाय संजय कपूरहचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

VIDEO: हतनूर धरणाचे 36 दरवाजे उघडले; तापी नदीजवळील गावांना सतर्कतेचा इशारा

Published by: Madhura Nerurkar
First published: August 26, 2019, 10:21 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading