आता होणार कंगना आणि सोनममध्ये 'कॅट फाईट'

आता होणार कंगना आणि सोनममध्ये 'कॅट फाईट'

आताही सोनम कंगना राणावतबद्दल असं काही बोललीय, की सोनम आणि कंगनाची कॅट फाईट होऊ शकते.

  • Share this:

मुंबई, 15 सप्टेंबर : सोनम कपूर सध्या चर्चेत आहे. कधी तिच्या फॅशनमुळे, तर कधी नवऱ्यासोबतच्या फोटोमुळे. पण बऱ्याचदा ती टाॅक आॅफ द टाऊन होत असते. आताही ती कंगना राणावतबद्दल असं काही बोललीय, की सोनम आणि कंगनाची कॅट फाईट होऊ शकते.

फीट अप विद स्टार्स या वूटवरच्या शोमध्ये सोनमनं कंगनाबद्दल खूप स्फोटक विधान केलंय. ती म्हणालीय, 'कंगना काचेचं छत तोडू शकते. त्यात ती माहीर आहे. त्यासाठी तुम्हाला उपद्रवीच असावं लागतं. एखाद्या वस्तूतही हलचल निर्माण करेल अशी कंगनाच आहे.' आता बोला! कंगनाच्या कानावर अजून तरी हे आलंय की नाही ठाऊक नाही.  पण आलं तर ती काय करेल, याचा विचार न केलेलाच बरा. सध्या तिचा मणिकर्णिका प्रचंड वादात आहे.

हमी कुठल्या न कुठल्या कारणाने चर्चेत असलेली कंगना आता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिचा आगामी चित्रपट ‘मणिकर्णिकाः द क्वीन ऑफ झांसी’ प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. यापूर्वी चित्रपटाच्या रिलीज डेटवरून खूप वाद झाला होता. आता कंगनासाठी यामध्ये अजून एक अडथळा निर्माण झाला आहे तो म्हणजे चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण होण्याआधीच सोनू सूदने हा चित्रपट सोडलाय.

सोनूच्या या निर्णयावर कंगणाने त्याच्यावर आरोप करत असं म्हटलं आहे की,सोनूने त्याच्या पात्रात त्याला हवे तसे बदल घडवून आणले होते,  ज्याची चित्रपटात फारशी गरज नव्हती. त्यामुळे आता त्याचे आधी शूट झालेल्या सीन्सचा काहीच उपयोग नसल्याने आम्ही नवीन पात्रासह हे सगळे सीन्स शूट करणार आहोत. शिवाय असं म्हणतात की मणिकर्णिका सिनेमात कंगनाची ढवळाढवळ चालते. तेच सोनू सूदला पसंत नाही.

मुकेश अंबानींच्या गणपतीला बाॅलिवूड सितारे हजर, पहा फोटोज्

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 15, 2018 11:56 AM IST

ताज्या बातम्या